Start more pumping  for 'Tembhu' water, demands farmers
Start more pumping for 'Tembhu' water, demands farmers 
मुख्य बातम्या

‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाले. मात्र, मुख्य पंपगृहातील केवळ दोनच पंप सुरू करून दुष्काळी पट्ट्यात पाणी सुरू आहे. परंतु, पंपाची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना पाणी वेळेत मिळणार नाही. त्यामुळे अधिकाधिक पंप सुरू करून पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महापुरानंतर टेंभू उपसा सिंचन योजनेतील मुख्य पंपगृहातील दुरुस्ती आणि देखभाल पाटबंधारे विभागाने पूर्ण केली. त्यामुळे ही योजना सुरू करण्यासाठी कसल्याच अडचणी समोर नव्हत्या. मात्र, पाण्याची मागणी नसल्याने ही योजना सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून दुष्काळी पट्ट्यातील कडेगाव, आटपाडी, विटा, यासह अन्य भागातील पाणीटंचाई निर्माण होऊ लागली. त्यामुळे शेतकरी ही योजना सुरू करण्याची मागणी करू लागले. परंतु, पाटबंधारे विभागाने योजना सुरू करण्यासाठी दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. 

कडेगाव तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले. त्यानंतर या योजनेचे आवर्तन सुरू केले. त्यास सात ते आठ दिवस झाले. तरी देखील, दुष्काळी पट्ट्यातील लाभ क्षेत्राला अद्यापही पाणी मिळालेले नाही. वास्तविक पाहता, योजनेतील कडेगाव हा पहिला लाभ क्षेत्र तालुका आहे. या तालुक्यात अजून योजनेचे पाणी आलेले नाही, याचाच अर्थ असा की, मुख्य योजनेच्या पंपगृहातील अवघ्या दोनच पंपांनी पाणी उपसा सुरू करून पाणीपुरवठा केला जातो आहे.

सध्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड करण्याचे नियोजन सुरु केले आहे. आडसाली, पूर्व हंगामी, सुरु उसाच्या लागवडी झाल्या आहेत. त्यामुळे या पिकांना पाणी कमी पडू लागले आहे.

उन्हाळी पिकांची लागवड लांबणीवर

पाटबंधारे विभागाने दोनच पंपाने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळणार नाही. त्यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. उन्हाळी पिकांची लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर मुख्य पंपगृहातील पंपाची संख्या वाढवून पाणी सोडवे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT