Start the auction in the grain market yard 
मुख्य बातम्या

धान्य मार्केट यार्डात लिलाव सुरू करा

बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात शेतकऱ्यांसमोर धान्य लिलावाची पद्धत सुरू करण्यासंबंधी राज्याच्या पणन संचालक कार्यालयाने बाजार समिती प्रशासनाला तंबी दिली आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात शेतकऱ्यांसमोर धान्य लिलावाची पद्धत सुरू करण्यासंबंधी राज्याच्या पणन संचालक कार्यालयाने बाजार समिती प्रशासनाला तंबी दिली आहे. तसेच बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अडतदार, प्रशासनाने लिलावाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासंबंधी सूचना दिल्याची माहिती मिळाली. 

या बाबत ‘अॅग्रोवन’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डातील बंद असलेले लिलाव आणि पारदर्शकतेचा अभाव या बाबतचे मुद्दे उपस्थित केले होते. त्याची दखल पणन संचालक कार्यालयाने दखल घेतली. लागलीच बाजार समितीमध्ये प्रशासनाशी पणन संचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चर्चा केली. जळगाव बाजार समितीचे स्वतंत्र नियम आहेत का, अशी विचारणा करून लिलाव सुरू करण्यासह कामकाजात पारदर्शकता आणण्याची तंबी दिली.

तसेच यानंतर सभापती कैलास चौधरी यांनीदेखील प्रशासन व अडतदार यांच्याशी चर्चा केली व आपले स्पष्टीकरणही दिले. त्यात सध्या धान्य मार्केट यार्डात धान्याची आवक शेतकऱ्यांकडून होत नसल्याची स्थिती आहे. आवक नसल्याने लिलाव होत नाहीत. पण हंगामात किंवा आवकेच्या काळात लिलाव रोज होतात. शेतकऱ्यांसमोर लिलाव करून रोखीने पैसे दिले जातात, असेही सांगितले. 

जळगाव बाजार समिती जिल्ह्यात सर्वांत मोठी बाजार समिती आहे. मका, हरभरा आदी पिकांसाठी जळगाव बाजार समिती प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल जळगाव बाजार समितीत आणावा. आपल्या अडचणी असल्यास प्रशासन, सभापती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सभापती चौधरी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT