नांदेड : नांदेड विभागातील चार जिल्ह्यात सध्या उसाच्या गाळपाला गती आली आहे. आठ सहकारी व १२ खासगी अशा एकूण वीस कारखान्यांनी आजपर्यंत १३ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप केले आहे. तर, दहा लाख ६७ हजार १३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
विभागाचा साखर उतारा ७.७७ टक्के आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून मिळाली. नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी, तर नऊ सहकारी साखर करण्याचा समावेश होता. आजपर्यंत २० कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. यात आठ सहकारी, तर १२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
गाळप सुरु केलेल्या कारखान्यात नांदेड जिल्ह्यातील हडसणी येथील सुभाष शुगर, कुंटूरकर शुगर्स लिमिटेड कुंटूर, व्यंकटेश्वरा शुगर लि. शिवणी, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव, शिवाजी सर्व्हीस स्टेशन बाऱ्हाळी, एमव्हीके शुगर वाघलवाडा या कारखान्यांचा समावेश आहे. तर, हिंगोलीमधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक दोन, पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमत, कपिश्वर शुगर लि. धाराशीव, शिऊर साखर कारखाना लि. वाकोडी, परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानखेड, योगेश्वरी शुगर लि. लिंबू, रेणुका शुगर लि. पाथरी, टेन्वटीवन शुगर लि. सायखेडा, त्रिधारा शुगर लि. अमडापूर हे कारखाने सुरु झाले आहेत.
लातूर जिल्ह्यातील विकास सहकारी साखर कारखाना लि. लातूर, विकास सहकारी साखर कारखाना युनिट क्र. दोन, सिद्धी शुगर लि., मांजरा सहकारी साखर कारखाना विलासनगर, साईबाबा शुगर लिमिटेड, हे कारखाने सुरु झाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.