साताऱ्यात उसाच्या गाळपाला वेग Speed of sugarcane threshing in Satara 
मुख्य बातम्या

साताऱ्यात अकरा लाख टन ऊसाचे गाळप

साताराजिल्ह्यात ऊस गाळप हंगामास गती आली आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत १० लाख ९० हजार ६४९ टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे १० लाख ८ हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्यात सरासरी ९.२४ टक्के साखर उतारा मिळत आहे.

टीम अॅग्रोवन

सातारा : जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास गती आली आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत १० लाख ९० हजार ६४९ टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे १० लाख  ८ हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्यात सरासरी ९.२४ टक्के साखर उतारा मिळत आहे.  जिल्ह्यात एकूण १६ पैकी १२ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू आहे. १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस हंगाम सुरू होऊन एकट्या श्रीराम सहकारी कारखान्याने दर जाहीर केला आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपी मिळणार का एफआरपीचे तुकडे होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. उसदराची दिशा यावर्षी कऱ्हाडातून होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. याकडे कारखान्यांने कसे पाहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बैठक आयोजित करण्याची मागणीही शेतकरी संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र ऊस दरात तोडगा काढण्यासाठी अजूनही प्रशासनाकडून कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील १२ कारखान्यांनी दहा लाख ९० हजार ६४९ टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे दहा लाख हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागली असून सध्या सरासरी ९.२४ टक्के उतारा मिळत आहे. अजूनही काही कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळित असल्याने आवश्यक गाळप होत नाही. अनेक कारखान्यांनी हंगामाच्या सुरवातीपासून ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जात आहे. बहुतांशी कारखान्यांकडून कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीवर भर दिला आहे. उसाचे क्षेत्र तसेच तोडणी यंत्रणांची उपलब्धता पाहता यावर्षी ऊस गाळप हंगाम लांबणार असल्याचे सांगितले जात आहे.

यंदाच्या गाळप हंगामावर दृष्टीक्षेप

  •  १० लाख ९० हजार ६४९ टन उसाचे गाळप
  •  १० लाख  ८ हजार क्विंटल साखर निर्मिती
  •  जिल्ह्यात सरासरी ९.२४ टक्के साखर उतारा 
  •  १६ पैकी १२ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू  
  •  फक्त श्रीराम सहकारी कारखान्याने दर जाहीर केला 
  •  ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर वाढला. 
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maha DBT: पूर्वसंमती बंद झाल्याने शेतकरी अडचणीत

    Wastewater Management: सांडपाणी ठरणार नवा जलस्रोत

    Cow Based Products: गो उत्पादनाचा ‘गो-टेन’ ब्रॅण्ड लवकरच बाजारात

    Banana Prices: खानदेशात केळीदरांवर दबाव

    Horticulture Conferences: डाळिंब, सीताफळावर सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय परिषदा

    SCROLL FOR NEXT