Special squad for land acquisition measure: Collector Shambharkar
Special squad for land acquisition measure: Collector Shambharkar 
मुख्य बातम्या

'उजनी ते एनटीपीसी पाइपलाइनसाठी भूसंपादन मोजणीसाठी विशेष पथके नेमा'

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘‘उजनी धरण ते एनटीपीसी दुहेरी पाइपलाइनसाठीच्या भूसंपादनाबाबत संयुक्त मोजणीचे काम गतीने करा. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने विशेष पथके स्थापन करावीत. गरज भासल्यास बाह्य यंत्रणेद्वारे काम करा,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी एनटीपीसी थेट पाइपलाइनच्या भूसंपादनाबाबत आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी ही सूचना केली. महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी शैलेश सूर्यवंशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भांडेकर, सहायक संचालक लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप, विशेष भूसंपादन अधिकारी सुनील देशपांडे आदी उपस्थित होते.

या पाइपलाइनद्वारे सोलापूर महापालिकेला पाणी पुरवले जाणार आहे. त्याबदल्यात महापालिका एनटीपीसीला त्यांच्याकडील पाणी पुरवणार आहे, अशी ही योजना आहे. या भूसंपादनासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यासाठी आवश्‍यक ती तरतूद या भूसंपादनात होणार आहे.

बैठकीच्या सुरुवातीस सूर्यवंशी यांनी भूसंपादनाच्या कामकाजाबाबतची वस्तुस्थिती सादर केली. त्यानुसार पाइपलाइनच्या कामासाठी आवश्‍यक असणाऱ्या जमिनीचे संपादन करणे आवश्‍यक आहे. संयुक्त मोजणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

सानप यांनी मोजणीसाठीचा प्रस्ताव आणि आवश्‍यक ते शुल्क भरण्याची प्रकिया झाल्यास गतीने संयुक्त मोजणी केली जाईल.

सोलापूर शहरात होणाऱ्या उड्डाण पुलाचीही चर्चा या वेळी झाली. उड्डाण पुलामुळे बाधित होणाऱ्या मिळकती, त्यापोटी द्यावा लागणारा भूसंपादन मोबदला, मिळकतधारकांनी घेतलेल्या हरकती, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT