Soybean area in Nagpur increased by 12,000 hectares
Soybean area in Nagpur increased by 12,000 hectares 
मुख्य बातम्या

नागपुरात सोयाबीन क्षेत्रात १२ हजार हेक्टरची वाढ

टीम अॅग्रोवन

नागपूर : कापूस शेतीत मजुरांची तसेच विक्रीत आलेल्या अडचणींच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीनला पसंती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन लागवड क्षेत्र १२००० हेक्टरने वाढल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

खरिपासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून ५ लाख १०० हेक्टरवरचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे विदर्भातील पारंपरिक पीक असलेल्या कापसाचे आहे. कापसाचे यंदा २ लाख ३५ हजार हेक्टरवर नियोजित क्षेत्र आहे. गतवर्षी कापसाची जिल्ह्यात २ लाख ३५ हजार २७५ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सद्यःस्थितीत कापसाची १ लाख ९२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सोयाबीनचे नियोजित क्षेत्र यंदा ८५ हजार हेक्टर असून, आजतागायत ९५ हजार हेक्टरवर म्हणजेच नियोजित क्षेत्राच्या १० हजार व गतवर्षीच्या तुलनेत १२ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.

धानाचे (भात) नियोजित क्षेत्र ९५ हजार हेक्टरवर असून, सद्यःस्थितीत केवळ ९ हजार ७५५ हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाली आहे. तर मक्याचे यंदा ५ हजार हेक्टर नियोजित क्षेत्र असून, यंदा मक्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी जिल्ह्यात मक्याची ३ हजार ६० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा आजपर्यंत ती ३ हजार ५०० हेक्टरवर झाली असून, मक्याच्या पेरणीला शेतकरी यंदा प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. तुरीचे जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवर नियोजन असून, आजवर ४३ हजार ६०० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.

यंदा माॅन्सूनचा पाऊस वेळेवर आल्याने पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून पूर्वीपासूनच वर्तविण्यात येत आहे. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे त्याचा खरिपाच्या पेरणीवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतू निसर्गाने साथ दिली सोबतच गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील भूजल पातळीतही लाक्षणिक वाढ झाली असल्याने पावसाच्या बाबतीत शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT