सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११ रुपये भाव
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११ रुपये भाव 
मुख्य बातम्या

सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११ रुपये भाव

हरी तुगावकर

लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात शनिवारी (ता. १९) उच्चांकी तीन हजार ८११ रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे. परदेशातून सोयाबीन आयात न झाल्यास दर चार हजारांच्या पुढे जाण्याची अंदाज व्यापाऱ्यांसह अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.   राज्यात गेल्या खरीप हंगामात ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. दिवाळीपासून ते नवीन वर्ष सुरू होईपर्यंत सोयाबीला फारसा भाव मिळत नव्हता. येथील आडत बाजारात गेल्या वर्षीच्या अखेरीस अडीच ते तीन हजारापर्यंतच भाव राहिला. राज्यात लातूर ही सोयाबीनची महत्त्वाची बाजारपेठ आहे. दररोज ४० ते ५० हजार क्विंटलची आवक या बाजारात सोयाबीनची होते. या बाजारपेठेत १० जानेवारी रोजी तीन हजार ५२५ रुपये प्रतिक्विंटलला भाव होता तोच भाव शुक्रवारी (ता. १९) तीन हजार ८११ पर्यंत पोचला आहे. येथील खासगी कंपन्या तर मार्चमध्ये पेमेंट डिलेव्हरीवर चार हजार रुपये दराने सोयाबीनची खरेदी करीत आहेत. नवीन वर्षाची सुरवात मात्र चांगली झाली आहे. परदेशातील सोयाबीन खरेदीवर केंद्र शासनाने बंदी घातली तर आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे. यातूनच शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. परदेशातील सोयाबीन आणल्यास आंदोलन : पाशा पटेल केंद्र शासनाने गेल्या वर्षी खाद्य तेल आयात शुल्कात चार वेळेस वाढ केली आहे. पेंड निर्यात अनुदान दहा टक्केपर्यंत वाढवले. आणखी पाच टक्के अनुदान वाढवावे म्हणून शिफारस केली आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चीनच्या कौन्सीलर जनरलची बैठक घेण्यात आली. त्यांना सोयाबीन पेंड खरेदीचे आवाहन करण्यात आले. या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडी शेतकरी व व्यापाऱ्यांपर्यंत पोचवण्यात आल्या. गेली काही महिने राज्यभर फिरून एकदम सोयाबीन बाजारात आणू नका असे आवाहन शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. त्याचा परिणाम आज सोयाबीनचे दर चार हजारपर्यंत गेले आहेत. हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण केंद्र शासनाने परदेशातील सोयाबीन भारतात आणण्यास व्यापाऱ्यांना परवानगी देऊ नये. जे व्यापारी परदेशातून सोयाबीन आणतील त्यांच्या विरोधात आपण स्वतः आंदोलन करणार आहे, अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. ..तर भाव वाढतील राज्यात यावर्षी सोयाबीनचे उत्पादन मोठे झाले आहे; पण भाव मात्र कमी होता. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी प्रयत्न केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. लातूरच्या बाजारात तीन हजार आठशे रुपयांच्या वर भाव राहिला. आम्ही तीन हजार ८७० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी केली आहे. मार्चमध्ये पेमेंट डिलेव्हरी असेल तर चार हजार रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने परदेशातील सोयाबीन भारतात येऊ दिले नाही तर हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया कीर्ती गोल्डचे संचालक अशोक भुतडा यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT