सातारा ः सोयाबीन खरेदीप्रश्‍नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडविल्यानंतर आंदोलकांशी चर्चा करताना पालकमंत्री विजय शिवतारे. (छायाचित्र ः प्रमोद इंगळे)
सातारा ः सोयाबीन खरेदीप्रश्‍नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडविल्यानंतर आंदोलकांशी चर्चा करताना पालकमंत्री विजय शिवतारे. (छायाचित्र ः प्रमोद इंगळे) 
मुख्य बातम्या

सोयाबीन खरेदीप्रश्नी पालकमंत्र्यांची गाडी अडविली

टीम अॅग्रोवन

सातारा : जाचक अटीमुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी शनिवारी (ता.२८) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर सोयाबीन रस्त्यावर फेकून दिले. तसेच नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे पालकमंत्री विजय शिवतारे यांची गाडी अडवली. तसेच पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या गाडीवर सोयाबीन ओतले.

या वेळी पोलीसांनी आंदोलनकर्त्याना जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. साताऱ्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक सकाळी अकरा वाजता होती. सकाळी साडेदहा वाजल्यापासून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष अतुल शिंदे, सरचिटणीस राजकुमार पाटील, निवास शिंदे यांच्यासह पक्ष्याचे कार्यकर्ते व शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर रस्त्यावर सोयाबीन ओतले.

तसेच घोषणाबाजी केली. नियोजनाच्या बैठकीला येणाऱ्या प्रत्येक आमदारांची गाडी अडवून सोयाबीनप्रश्नी आवाज उठविण्याची मागणी केली. त्यानंतर बरोबर अकरा वाजता पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या गाडीवर सोयाबीन ओतले. त्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली. त्यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या गाड्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट जवळ आला.

पालकमंत्र्यांची गाडी अडवली जाईल या भीतीने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण पालकमंत्री यांनी त्यांची गाडी थेट गेट जवळ आणण्यास सांगत ते स्वतः गाडीतून उतरले. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले व त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पण त्यांनी सर्वाना शांत होण्याचे आवाहन करीत तुमचे म्हणणे मांडा असे सांगितले. त्यानंतर श्री. शिवतारे यांनी म्हणणे ऐकून घेत सोयाबीनप्रश्‍नी सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.

या आंदोलनात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष समिद्रा जाधव, सारिका तपासे, कुसुमताई भोसले, मारुती इदाटे, तसेच राष्ट्रवादी युवक, जिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT