नगर जिल्ह्यात खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर पेरणी होणार
नगर जिल्ह्यात खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर पेरणी होणार 
मुख्य बातम्या

नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन

टीम अॅग्रोवन

नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी हंगाम बुडाला. मात्र जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

त्यामुळे पूर्वमशागतीच्या कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागही खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. पेरणीसाठी ७० हजार क्विंटल विविध पिकांच्या वाणांची मागणी कृषी विभागाने नोंदवली. यापैकी आजअखेर चाळीस हजार क्विंटल मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, उडीद आदी वाणांचे बियाणे प्राप्त झाले आहेत. कृषी विभागाला साडेपाच लाख हेक्‍टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात टंचाईचे सावट आहे. चौदा लाख लोकांची तहान भागविण्यासाठी जिल्ह्यात ८४९ टॅंकर धावत आहे. 

जिल्ह्यात ५०४ चारा छावण्या सुरू आहेत. त्यात साडेतीन लाख पशुधन दाखल आहे. मागील चार दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. कपाशीसाठी तीन लाख ७५ हजार पाकिटे प्राप्त झाली आहेत. यूरिया, डीएपी आदी रासायनिक खतांकरिता कृषी विभागाने दोन लाख दोन हजार टनांचे मागणी नोंदवली होती. त्यापैकी एक लाख ७० हजार टन रासायनिक खते प्राप्त झाली आहेत.

पीकनिहाय पेरा अपेक्षित (हेक्‍टरमध्ये) भात (१९ हजार), बाजरी (दीड लाख), नागली (एक हजार ९००), तूर (१७ हजार ५००), मूग (४० हजार), उडीद (३५ हजार), सोयाबीन (८५ हजार), भुईमूग (८ हजार), मका (५५ हजार), कापूस (एक लाख ३० हजार).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT