ऊसतोड कामगारांच्या तुटवड्याने हंगाम संथ गतीने
ऊसतोड कामगारांच्या तुटवड्याने हंगाम संथ गतीने 
मुख्य बातम्या

ऊसतोड कामगारांच्या तुटवड्याने हंगाम संथ गतीने

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : करार केल्यापेक्षा ऊसतोडणी कामगार कमी प्रमाणात आल्याने दक्षिण महाराष्ट्रातील उसाचा यंदाचा हंगाम किमान एक महिना लांबण्याची शक्‍यता आहे. अंतिम टप्प्यात पडलेल्या पावसाने यंदा उसाच्या उत्पादनात एकरी पाच ते दहा टनांनी वाढ झाली आहे. यामुळे तोडणीस वेळ लागत आहे. यामुळेच तोडणीचा कार्यक्रमात एक महिना लांबण्याची शक्‍यता असल्याचे कारखाना प्रतिनिधींचे म्हणणे आहे. कोल्हापूर व सागंली दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांशी कारखाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालतील असा अंदाज आहे.

यंदाचा हंगाम नोव्हेंबरला सुरू झाला. पण वाफसा नसल्याने काही काळ तोडणी कार्यक्रम संथ गतीने चालला. वाफसा येण्यास सुरवात झाल्यानंतर तोडणी सुरू झाली खरी, पण तोडणी कामगारात घट झाली आणि उसाचे उत्पादनही वाढले. याचा परिणाम यंदाच्या हंगामावर दिसून येत आहे. शिवारात ऊस आहे. त्याची वेळेत तोड होत नसल्याने कारखान्याची गडबड सुरू झाली आहे. सध्या प्रत्येक कारखान्याचा निम्मा हंगाम आटपला आहे, पण शिवारात ऊस असल्याने त्याचा स्पष्ट दबाव तोडणी यंत्रणेवर येत आहे. 

सध्या आडसाली उसाच्या तोडणीही अंतिम टप्प्यात आहेत. यंदा खोडव्याबरोबर निडव्याच्या उत्पादनातही पाच ते दहा टनांनी वाढ झाली आहे. ऊसतोड लवकर होत नसल्याने शेतकऱ्यांची क्रमवारी उशिरा येत असल्याचे ऊस पट्ट्यातील चित्र आहे. जानेवारीच्या पहिल्या सप्ताहाअखेर कोल्हापूर व सागंली जिल्ह्यात एक कोटीहून अधिक मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा उसाच्या क्षेत्रात दहा ते पंधरा टक्क्‍यंनी वाढ झाली आहे, पण पाऊस नसल्याने उत्पादन घट येईल ही शक्‍यता मात्र प्रत्यक्ष ऊसतोडणीच्या वेळी फोल ठरली आहे. यातच मजुरांची टंचाई ही कारखान्यांची डोकेदुखी ठरली आहे.  पुढील वर्षी बिकट स्थिती? यंदा तोडीचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी कसरत होत आहे. पुढच्या वर्षी तर ऊसलावणीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. यामुळे पुढच्या हंगाम हा आणखी परीक्षा पाहणारा ठरेल, असा अंदाज आहे. सध्याचा तोडीची अवस्था पाहता फेब्रुवारीत हंगामसमाप्ती होणे अशक्‍य असल्याचे कारखानदार सूत्रांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT