Soon Plan for Sheep Protection: Filling Dattatraya
Soon Plan for Sheep Protection: Filling Dattatraya 
मुख्य बातम्या

मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ः दत्तात्रय भरणे 

टीम अॅग्रोवन

सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व गारठ्यामुळे राज्यातील सुमारे साडेतीन हजार मेंढ्या मृत्युमुखी पडून मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. पण भविष्यात असे नुकसान टाळण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का यावर विचार विनिमय चालू असल्याचे सूतोवाच राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुपे (ता. बारामती) येथे केले.  सुपे व परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. भरणे यांनी शुक्रवारी (ता.३) रात्री आठच्या दरम्यान पावसाळी वातावरणात कुतवळवाडीतील नुकसानग्रस्त मेंढपाळांच्या वाड्यावर जाऊन पाहणी करून उपस्थित मेंढपाळांना सरकारकडून प्रती मृत मेंढीस चार हजार रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही दिली. पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. निसर्गाचे संकट आहे. सामोरे गेले पाहिजे. आम्ही सरकार म्हणून तुमच्या पाठिशी आहोत. निसर्गापुढे कोणाचे चालत नाही. तुम्हाला आधार देण्याचे काम सरकार करत आहे, असा धीर मेंढपाळांना दिला. यावर कायमस्वरूपी काय करता येईल यासाठी तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवून उपाययोजना करण्याचे विचाराधीन असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. 

अशी मिळणार मदत  तालुक्यातील कानाडवाडीत लांडग्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या दगावल्या असून, त्यांना वन विभागाकडून मदत मिळण्यासाठी संबंधितांना सूचना केल्याचे सांगून भरणे म्हणाले, ‘‘राज्यातील विशेषतः पुणे, नगर, सातारा, नाशिक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे मेंढ्या दगावल्या आहेत. पुणे २०००, नगर ७००, नाशिक ५१५, सातारा २०० मेंढ्या दगावल्या आहेत. यापैकी पुणे जिल्ह्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी सुमारे साडेसातशे मेंढ्या दगावल्याची नोंद आहे. गारठा असल्याने मृत मेंढ्यांचा आकडा आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे दगावलेल्या एका गाईसाठी ४० हजार, बैलासाठी ३० हजार तर शेळी-मेंढीसाठी ४ हजार रुपये मदत दिली जाणार आहे.’’ 

विम्याची मागणी भविष्यात असे नुकसान टाळण्यासाठी मेंढपाळांना निवारा, कारपेट, विमा सारखी कायमस्वरुपी योजना राबवण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी या वेळी केली. रामभाऊ लकडे, भानुदास चौधरी, अनिल हिरवे, दत्तात्रेय कदम, शंकर महानवर, भीमा कोकरे आदींनी या वेळी नुकसानीची माहिती दिली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नायब तहसीलदार विलास करे, तालुका पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर. आर. पाटील, मंडलाधिकारी लक्ष्मीकांत मुळे, अभिमान माने आदींसह परिसरातील कार्यकर्ते, मेंढपाळ, शेतकरी उपस्थित होते. 

मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यात  ५ हजार पशुधन मृत्युमुखी 

पुणे ः गेल्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसाने भिजल्याने आणि थंडी वाजल्याने राज्यात सुमारे ५ हजार पशुधन, शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे झाली. या घटनांचे पंचनाने सुरू करण्यात आले असून, हा आवका वाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर सर्वाधिक पुणे जिल्ह्यात २ हजार पशुधन दगावल्याची नोंद झाली आहे.  रायगड, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, पुणे आणि सातारा या प्रमुख तालुक्यांमध्ये शेळ्या मेंढ्या आणि पशुधन मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या सहा जिल्ह्यांतील ४० तालुके आणि ३२१ गावांमध्ये घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये १९ गायी, ३ म्हशी, २ बैल, ५ वासरे आणि ४ हजार ७२९ शेळ्या-मेंढ्याची नोंद झाली आहे. हा आवका आणखी वाढण्याची शक्यता आहे.  अनेक ठिकाणी मेंढपाळांना मेंढ्यांवरची लोकर काढल्याने अचानक आलेला पाऊस आणि थंडीचा अधिक तडाखा त्यांना बसल्याने मृत्युमुखी पडल्याच्या घटना वाढल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले. तर अनेक ठिकाणी तातडीचे लसीकरण आणि पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्याचे आदेश सर्व पातळीवरील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT