A single rates should be announced banana in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात एकच केळी दर जाहीर करावा

जळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर होतात. रावेर बाजार समिती केळी दर जाहीर करते. त्यात जळगावसाठी वेगळे व रावेर भागासाठी वेगळे दर असतात. यात दरांमध्येही क्विंटलमागे २० ते ३० रुपयांची तफावत असते. एकच दर खानदेशसाठी जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर होतात. रावेर बाजार समिती केळी दर जाहीर करते. त्यात जळगावसाठी वेगळे व रावेर भागासाठी वेगळे दर असतात. यात दरांमध्येही क्विंटलमागे २० ते ३० रुपयांची तफावत असते. एकच दर खानदेशसाठी जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

केळीची मध्यंतरी कमी दरात खरेदी केली जात होती. याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. या तक्रारीची किती दखल प्रशासनाने घेतली, हा मुद्दा आहे. पण केळीचे वेगवेगळे दर अनेक वर्षे जाहीर केले जात आहेत. यातच रावेर भागात कांदेबाग केळीची लागवड केली जात नाही. तरीदेखील रावेर बाजार समिती कांदेबाग केळीचे दर कसे जाहीर करते, हा प्रश्न जळगाव, चोपडा बाजार समिती व या भागातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

कांदेबाग केळीची लागवड जळगाव, चोपडा, पाचोरा-भडगाव, जामनेर भागात असते. यामुळे याच भागातून कांदेबाग केळीचे दर जाहीर करण्याची कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

रावेर बाजार समितीचा कांदेबाग केळीसंबंधीचा हस्तक्षेप बंद करावा. रावेर बाजार समिती दर जाहीर करते, पण कमी दरात केळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर काय कारवाई केली? याचे उत्तर मात्र रावेर बाजार समिती देत नाही. रावेर बाजार समितीचे दर धुळे जिल्ह्यातही दिले जातात. यामुळे एकाच संस्थेने दर जाहीर करावेत व ते खानदेशसाठी लागू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT