नाशिक : निफाड तालुक्यात सहकार विभागाने नोंदणी केलेल्या १० नवीन विविध कार्यकारी सोसायट्यांची नोंदणी रद्द करावी व त्या सोसायट्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेले बेकायदेशीर कर्जवाटपात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी निफाड तालुका शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सहकार विभागाविरोधात शुक्रवार(ता. ४) शिवसेनेने साखळी उपोषण सुरू केले होते. यावर निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांना खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी आठ दिवसांत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांसोबत सकाळी ११ वाजेपासून उपोषण सुरू होते. दरम्यान, सायंकाळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या शिष्टमंडळाशी विभागीय निबंधक लाटकर यांच्याशी चर्चा केली. वेळी आठ दिवसांत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळीविभागीय उपनिबंधक गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अनिल कदम यांनी नवीन सहकारी संस्था बेकायदेशीरपणे स्थापन झाल्याबाबत व बेकायदेशीर कर्जवाटपाबाबत २ जून २०२१ रोजी तक्रार केली होती. त्या कामी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून संबंधित विभागास चौकशी करून अहवाल कदम यांना सादर करण्याविषयी आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित विभाग यांनी कार्यवाही करण्याकामी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सहायक निबंधक, निफाड यांना आदेश दिले. त्याकामी सहायक निबंधकांनी अहवाल देण्यास दिरंगाई करून खोटा अहवाल दिलेला आहे. वास्तविक या अहवालातील माहिती व नाशिक जिल्हा बँकेने दिलेली माहिती यात मोठी तफावत आहे. यावरून सहायक निबंधकांनी दिलेला अहवाल खोटा असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.