मुख्य बातम्या

गावोगावी घेणार निषेध सभा : शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा  : धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस सरकारच जबाबदार असून, याबद्दल सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटना व कामगार सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी गावोगावी निषेध सभा घेण्याचेही संघटनेने स्पष्ट केले. येथील कोल्हापूर नाक्‍यावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळून तहसील कार्यालयात जाऊन बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, बळिराजाचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, कामगार संघटनेचे अनिल घराळ यांच्यासह विक्रम थोरात, पोपट जाधव, काकासाहेब शिंदे, प्रताप पाटील, प्रदीप मोहिते, प्रमोद जगदाळे, सागर कांबळे, दिलीप कोठावळे, योगेश झांबरे आदींच्या वतीने सोमवारी (ता. २९) तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्याकडे निवेदन देण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सोमवारचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल, अशी घटना घडली आहे. याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा पहिला बळी धर्मा पाटील यांच्या रूपाने गेला आहे. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस सरकारच जबाबदार असून, सरकारवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर गावागावांत सरकारच्या निषेध सभा आयोजित करून धर्मा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करणार आहोत, असाही इशारा संघटनांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

SCROLL FOR NEXT