शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावर
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावर 
मुख्य बातम्या

शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावर

टीम अॅग्रोवन

मुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची राजकीय पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. पक्षाला लागलेली गळती लक्षात घेऊन निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी पवार आज १७ सप्टेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरवात सोलापूर येथून होईल.

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना आमदारांसह आता खासदारही पक्ष सोडू लागले आहेत. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते एकामागोमाग एक बाहेर पडत असल्याने कार्यकर्ते कमालीचे खचले आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी तसेच पक्ष संघटनेत प्राण फुंकण्यासाठी पवारांनी दौरा आखला आहे. 

या दौऱ्यात पवार हे जिल्हा, तालुक्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज करणार आहेत. १७ ते २२ सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात पवार हे सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नगर आणि सातारा या जिल्ह्यांचा दौरा करताना कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT