Shankar factory will also pay the bill as per FRP 
मुख्य बातम्या

शंकर कारखानाही एफआरपीप्रमाणे बिल देणार ः मोहिते पाटील

अकलूजचा सहकारमहर्षी साखर कारखाना जेवढी एफआरपी तेवढी एफआरपी श्री शंकर कारखान्याचीही राहील, अडचण असली, तरी ती आम्ही देऊ, त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित राहावे, असे कारखान्याचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः अकलूजचा सहकारमहर्षी साखर कारखाना जेवढी एफआरपी तेवढी एफआरपी श्री शंकर कारखान्याचीही राहील, अडचण असली, तरी ती आम्ही देऊ, त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चित राहावे, असे कारखान्याचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या गळीत हंगामाची सुरुवात बुधवारी (ता. २७) माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार राम सातपुते, मदनसिंह मोहिते, अॅड. मिलिंद कुलकर्णी, बाबाराजे देशमुख, धैर्यशील मोहिते, सभापती शोभा साठे आदी उपस्थित होते.

सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते यांनी शंकर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम बंद झाल्यानंतर महिन्याच्या आत एफआरपी अदा केली जाईल. अकलूजच्या सहकारमहर्षी  कारखान्याची जी एफआरपी निघेल, ती या कारखान्याकडून अदा करण्याचा शब्दही जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT