वऱ्हाडात सहा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळ
वऱ्हाडात सहा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळ 
मुख्य बातम्या

वऱ्हाडात सहा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळ

टीम अॅग्रोवन

अकोला : अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे वऱ्हाडात अकोला व बुलडाणा जिल्ह्यात सहा तालुक्‍यांमध्ये दुष्काळी स्थिती गंभीर आहे. या तालुक्‍यांमध्ये दुष्काळाच्या नव्या निकषानुसार ट्रिगर-२ (दुसरी कळ) लागू झाला असल्याने या तालुक्‍यातील गावांमध्ये पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा कृषी यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

वऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर आणि शेगाव, तर अकोला जिल्ह्यात अकोला तालुक्‍यात दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली आहे. दुसरी कळ लागू होणे म्हणजे ही परिस्थिती गंभीर असल्याचे मानले जाते. मध्यम स्वरूपाचा दुष्काळही बऱ्याच तालुक्‍यांमध्ये आहे. यात अकोला जिल्ह्यात बाळापूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा हे तालुके मोडतात. बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर, मोताळा, सिंदखेडराजा या तालुक्‍यांचा समावेश आहे. याशिवाय वाशीम जिल्ह्यातील रिसोड हा एकमेव तालुका मध्यम स्वरूपातील दुष्काळ या गटात बसला आहे.

अकोला व वाशीम जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली खरी मात्र दोन पावसांमध्ये मोठ्या अंतराचे खंड पडले. बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या  ६९ टक्केच पाऊस झाला. त्यातही या जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, या तालुक्‍यांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला. खरिपात लागवड केलेल्या मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची उत्पादकता जेमतेम आहे. कपाशीचे उभे पीक ओलाव्याअभावी सुकत आहे. झाडांवर जेवढ्या बोंड्या लागल्या त्यातून कापूस येत आहे. अकोल्यात खारपाण पट्ट्यात सोयाबीनची उत्पादकता ५० किलोपासून तीन क्विंटलपर्यंत आलेली आहे. सध्या कपाशी व तुरीचे पीक उभे आहे. या पिकांमधून किती उत्पन्न येईल, याची शाश्‍वती दिसून येत नाही. परतीचा पाऊसही न झाल्याने रब्बी हंगामावर परिणाम होणार आहे.

अकोल्यात काही प्रकल्पांमधून रब्बीसाठी पाणी दिले जात आहे. त्यामुळे ही पिके येऊ शकतील. परंतु बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून केवळ १७ टक्के पाणीसाठा असल्याने सर्व प्रकल्पांतील पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे व तातडीने उपसा बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. शासकीय यंत्रणांना नव्या निकषानुसार माहिती गोळा करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, ही माहिती एकत्रित केल्यानंतर ३१ ऑक्‍टोबरला दुष्काळावर अंतिम मोहोर उमटण्याची शक्‍यता आहे. शासनाने यासाठी तातडीने ट्रीगर दोन लागू झालेल्या तालुक्‍यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT