Self Help Group Festival from 28th at Kaneri Math 
मुख्य बातम्या

कणेरी मठ येथे २८पासून बचत गट महोत्सव

कोल्हापूरयेथील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने महाशिवरात्री निमित्त कणेरी मठ येथे सोमवार २८ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत बचत गट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : येथील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने महाशिवरात्री निमित्त कणेरी मठ येथे सोमवार २८ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत बचत गट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बचत गटांना आपले पदार्थ विक्री करण्याची मोठी संधी यानिमित्त मिळाली आहे.  या महोत्सवामध्ये ३५ स्टॉल उभारण्यात येणार असून, सर्व स्टॉल बचत गटांचे असणार आहेत. प्राधान्य क्रमानुसार बचत गटांना महोत्सवातील स्टॉल दिले जाणार आहेत.  कणेरी मठावर प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक मठास या निमित्ताने भेट देत असतात. याचा फायदा बचत गटांना व्हावा या हेतूने कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रवींद्र सिंह यांनी दिली.  कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने वर्षभर बचत गटांना प्रोत्साहन दिले जाते. बचत गटाकडील पदार्थ कणेरी मठावरही विक्रीसाठी असतात. या महोत्सवाच्या निमित्ताने बचत गटांना आपली उत्पादने जलद रीतीने विक्री करणे शक्य होणार आहे. बचत गटांनी तातडीने आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी केंद्रांच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT