Satara District Bank allocates 134% crop loans
Satara District Bank allocates 134% crop loans 
मुख्य बातम्या

सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के पीककर्ज वाटप

टीम अॅग्रोवन

सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१ करिता जिल्ह्याचे एकूण पीककर्ज वाटप उद्दिष्ट २२०० कोटी पैकी सातारा जिल्हा बँकेचे १३०० कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये खरीप पिकासाठी निश्चित केलेले ९५० कोटी असून आजअखेर २ लाख २६,७१३ शेतकरी सभासदांना १२७८ कोटी इतके कर्ज वाटप झाले आहे. उद्दिष्टाचे १३४ टक्के पूर्तता करून पीककर्ज वितरण करण्यात आल्याने बँकेने उल्लेखनीय काम केले असल्याचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना ३२० शाखा व ९५३ विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून बँकिंग सुविधा पुरविण्याचे निरंतर कार्य करीत आहे. बँकेच्या वसुली यंत्रणेच्या विनंतीस प्रतिसाद देऊन बँकेशी बांधीलकी असलेल्या या जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने प्रामाणिकपणे शेती कर्जाची वेळेत परतफेड केली आहे. याचाच परिणाम म्हणून बँकेने आपली वसुलीची परंपरा कायम राखत यावर्षीही शेती कर्जाची ९७ टक्के वसुली करून राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार पीककर्ज परत फेडीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. जे शेतकरी अद्याप पीक कर्जाची परतफेड करू न शकल्याने नवीन पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहिलेले आहे, अशा सभासदांनी वाढीव मुदतीचा फायदा घेऊन आपले पीककर्ज भरून शासनाच्या व्याज परतावा व इतर योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आमदार भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे. तसेच चालू वसुली हंगामात पीक कर्ज वसुलीसाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व विकास सेवा संस्थांचे अध्यक्ष, पंचकमिटी सदस्य व सचिव यांचे बँकेच्या वतीने आभार व्यक्त केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT