संग्रामपूर, जि. बुलडाणा ः मोजमाप करताना कर्मचारी.
संग्रामपूर, जि. बुलडाणा ः मोजमाप करताना कर्मचारी. 
मुख्य बातम्या

संग्रामपूर तूर खरेदी केंद्र अखेर सुरू

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  : संग्रामपूर येथील तूर खरेदी केंद्रावर जागेअभावी तूर खरेदी बंद होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सोमवारपासून केंद्र सुरू झाले. या तूर खरेदी केंद्रावर तालुक्यातील ५,१९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ५०५ शेतकऱ्याचेंच तुरीचे मोजमाप झाले. पण उर्वरित ४,६९४ शेतकऱ्यांची तूर अजूनही घरात पडून आहे. त्या शेतकऱ्यांची तूर केव्हा मोजणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता.

याचीच दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात ७ एप्रिलला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तत्काळ तूर खरेदी केंद्र सुरू करा, जागा नसेल तर आमचे घर घ्या; पण तूर खरेदी सुरू करा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याच धसक्याने सोमवारपासून (ता. १६) संग्रामपूर तूर खरेदी केंद्र सुरू करून  शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT