Sangli market committee closed for seven days from today 
मुख्य बातम्या

सांगली बाजार समिती आजपासून सात दिवस बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी वसंतदादा मार्केट यार्ड ६ ते १२ मेअखेर आठवड्यासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

सांगली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी वसंतदादा मार्केट यार्ड ६ ते १२ मेअखेर आठवड्यासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.

चेंबर ऑफ कॉमर्स आणि हमाल संघटनेची चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विष्णूअण्णा फळ मार्केट बाबतचा अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. परंतु फळ व्यापारी संघटनेशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती आहे. एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्याचबरोबर कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढतच आहे. शासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध लादले आहेत. तसेच संचारबंदी केली आहेत. बाजार समिती आवारातील बेदाणा सौदे काही दिवसांपूर्वी बंद झाले आहेत. परंतु हळद व इतर सौदे सुरू होते. तसेच किराणा व भुसार माल विक्री सकाळी ११ पर्यंत सुरू होती.

जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातील मार्केट यार्डामध्ये शेतकरी आणि खरेदीदार येतात. हळद, गुळाचे सौदे सुरू आहेत. या सौद्यासाठीही शेतकरी मोठ्या प्रमाणात येत आहेत. वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळेच चेंबर ऑफ कॉमर्स आणि जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मार्केट यार्ड बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.

याबाबत व्यापारी आणि हमाल संघटनेच्या प्रतिनिधींची आज बैठक घेण्यात आली. बैठकीत बाजार समिती, चेंबर ऑफ कॉमर्स आणि हमाल पंचायतीच्या वतीने सध्याच्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. परंतु कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्केट यार्ड पूर्णपणे बंद ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे चर्चेतून स्पष्ट झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

Bhama Askhed Dam: भामा-आसखेडचे आवर्तन लांबणीवर

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

SCROLL FOR NEXT