In Sangli district, 50% grape pruning was completed 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष फळछाटणी उरकली

जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती वाढली आहे. पन्नास टक्के फळछाटणी झाली असून, जत तालुक्यात नोव्हेंबरमध्ये छाटणी सुरू होईल, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाने दिली.

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती वाढली आहे. पन्नास टक्के फळछाटणी झाली असून, जत तालुक्यात नोव्हेंबरमध्ये छाटणी सुरू होईल, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाने दिली.

जिल्ह्यात द्राक्षाचे सरासरी सव्वा लाख एकर क्षेत्र आहे. जिल्ह्यामध्ये मिरज पूर्व भाग, आटपाडी या भागांत आगाप फळछाटणी घेतली जाते. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाची रिमझिम आणि बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फळ छाटणी थांबवली होती. त्यानंतर जिल्ह्यातील मिरज आटपाडी आणि वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळ छाटणीस सुरुवात केली. 

वास्तविक पाहता आगाप छाटणीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र या वर्षी शेतकऱ्यांनी फळ छाटणी न करता टप्प्याटप्प्याने छाटणी सुरुवात केली आहे. त्यामुळे छाटणीचे काटेकोर नियोजन होत असल्याचे चित्र आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये छाटणी केलेल्या द्राक्षांना ४० दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. सध्या या भागात फुलोरा अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी वांझ, फूट काढण्याची कामे शेतकरी करू लागला आहे. 

सध्या द्राक्ष पिकास पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात साठ हजार मजूर असल्याने मजुरांची टंचाई भासत नाही. प्रत्येक भागामध्ये द्राक्ष पिकाचे वेगळे चित्र दिसते. पुढच्या पंधरा दिवसांपासून विरळणीचे करण्याचे काम सुरू होईल. पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील सर्व भागांत पाण्याची उपलब्धता असल्याने द्राक्ष पिकास पाणी कमी पडणार नाही. या महिना अखेर ८० टक्के छाटणी पूर्ण होईल.

जतमध्ये पुढील महिन्यात छाटणीस प्रारंभ जत तालुक्यात प्रामुख्याने बेदाणा केला जातो. या भागात परतीचा पाऊस होतो. यामुळे द्राक्षाचे नुकसान होऊन होऊ नये यासाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्ष फळछाटणी शेतकरी नियोजन करतात. यंदाही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून फळछाटणी सुरुवात होईल.;

या वर्षी उशिरा सुरू झाली आहे. सध्या पिकास पोषक वातावरण असल्याने आगाप फळ छाटणी घेतलेल्या बागेतील गर्भधारणा चांगल्या प्रकारे झाली आहे. आगाप घेतलेल्या फळछाटणी बागा घेतलेल्या फुलोरा अवस्थेत आहे. - सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Preservation Technology: अन्नपदार्थ साठवण कालावधी वाढविण्याचे तंत्रज्ञान

Shettale Yojana: शेततळे अनुदान, १७ हजार अर्ज रद्द, कारण काय?

Ammonium Sulphate Fertilizer: अमोनिअम सल्फेटचा फायदेशीर वापर

Maharashtra Agri Issues: शेतीसाठी उसंत आहे कुणाला?

Fertilizer Shortage: खतटंचाईवर नियोजनाचा उतारा

SCROLL FOR NEXT