Saffron crop demonstration inspection in copper by the director of 'Atma' 
मुख्य बातम्या

‘आत्मा’च्या संचालकांकडून तांबवात करडई पीक प्रात्यक्षिक पाहणी

केज, जि. बीड : केज तालुक्यातील तांबवा या गावात करडई पिकांची ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डी. जी. मुळे यांनी पाहणी केली.

टीम अॅग्रोवन

केज, जि. बीड : केज तालुक्यातील तांबवा या गावात करडई पिकांची ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डी. जी. मुळे यांनी पाहणी केली. 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) तालुका कृषी अधिकारी केज यांच्या वतीने करडई पीक प्रात्यक्षिक म्हणून रब्बी हंगामात केज तालुक्यातील तांबवा या गावात घेतले. दहा हेक्टर क्षेत्रावर करडई पीक प्रात्यक्षिक म्हणून पीबीएनएस -१२ या जातीच्या करडई पिकाची पेरणी करण्यात आली.

करडई तेलाची सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. या तेलामध्ये रक्तातील कोलेस्टरॉल कमी करण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे हृदय रोगांसाठी फायदेशीर असते. नवीन तंत्र शेतकऱ्यांना माहिती व्हावे, यासाठी करडईची शेतीशाळा या ठिकाणी राबविण्यात येत आहे. त्यामधून शेतकऱ्यांना करडई विषयी माहिती दिली जाते.  

सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पिकावर रोगाचा, मावा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. करडईवरील मावा नियंत्रणासाठी डायमिथॉऐट ३० टक्के, आझाडीरिकटिनची फवारणी करण्याची सूचना मुळे यांनी शेतकऱ्यांना केली.  करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असून पाणी कमी लागते. परंतु, पीक फुलोऱ्यात येतेवेळी मात्र पाणी देणे गरजेचे असते. त्यामुळे फुलांची संख्या, वजन वाढून उत्पादन वाढते, असेही त्यांनी सांगितले. या वेळी मस्साजोगचे मंडळ कृषी अधिकारी विकास अंभोरे आदी शेतकरी उपस्थित होते.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT