kop dam
kop dam  
मुख्य बातम्या

कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी सर्व नद्यांचे पाणी कमी होणार याबाबतचा पाटबंधारे विभागाने व्यक्त केलेला अंदाज चुकल्याने रविवारी (ता.२५) दुपारपर्यंत पूरग्रस्त शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी वाढतच होते. यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली. पाणी कमी होत नसल्याने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. परंतु रविवारी दुपारपर्यंत पाणी वाढत असल्याने पूरग्रस्त भागात घबराहट होती. 

पंचगंगा नदीचे पाणी गतीने ओसरले, परंतु कृष्णा व वारणा या नद्यांचे पाणी दुपारपर्यंत वाढतच होते. यामुळे अनेक गावे पुराच्या दहशतीच्या वातावरणातच राहिली. अर्ध्या अर्ध्या तासाला एक इंच पाणी वाढू लागल्याने स्थलांतर करावे की न करावे या संभ्रमात नागरिक राहिले. पाटबंधारे विभागाने शनिवार सायंकाळपासून पाणी ओसरू लागेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार ग्रामस्थ निश्‍चिंत होते. परंतु रविवारी मध्यरात्रीही पाणी वाढू लागल्याने अस्वस्थता पसरली. अंदाज चुकल्याने २००५ व २०१९ ची पूरस्थिती परत येते की काय? अशी शंका येऊ लागल्याने पुन्हा घबराहट पसरली. कोयना धरणातून ३० हजार, तर वारणा धरणातून ८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणीपातळी अपेक्षेप्रमाणे कमी झाली नाही. 

पावसाचा जोर ओसरला  पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतुकीसह अन्य व्यवहार पूर्ववत होत आहेत. पुणे-बंगळूर महामार्ग सुरू करण्यासाठी रविवारी दुपारपर्यंत प्रशासनाच्या हालचाली सुरू होत्या. अद्याप बस सेवा सुरू झाली नाही. एनडीआरएफच्या जवानांकडून करवीर व शिरोळ तालुक्यांत बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे असणारे राधानगरी धरण ही आता भरण्याच्या अंतिम टप्प्यात आले आहे. कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून त्यातून भोगावती नदी पात्रात विसर्ग होऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT