Response to the end of market committees in Nashik
Response to the end of market committees in Nashik 
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये बाजार समित्यांच्या संपाला प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

नाशिक  : केंद्राने बाजार समित्यांच्या संदर्भात नियमनमुक्तीचा अध्यादेश काढल्याने त्याचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने एकदिवसीय लाक्षणिक बंदची हाक दिली होती. त्याला जिल्ह्यातील बाजार समित्यांनी प्रतिसाद देत शुक्रवार (ता.२१) हा संप यशस्वी केल्याचे जिल्हाभर पाहायला मिळाले.

नियमिनमुक्तीच्या आदेशामुळे बाजार समित्यांना अडचणीत आणून केंद्र काय साध्य करणार असा प्रश्न यानिमित्ताने बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. ज्या बाजार समित्या चांगल्या व पारदर्शक काम करतात, त्यांना पाठबळ द्यावे अन ज्या चुकीचे काम करतात, त्यांना कडक शासन करावे. सर्व बाजार समित्या चूकीच्या नाहीत. उलट व्यापाऱ्यांना नियमूनमुक्त करून शेतकऱ्यांची खरेदी विक्री प्रक्रिया अपारदर्शक करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला. 

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी शुक्रवार (ता.२१) पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या. पूर्वसूचना दिल्याने आवक झाली नाही. 

बाजार समित्यांमध्ये स्पर्धा असते, मात्र या अध्यादेशामुळे शेतमालाच्या दरात ना स्पर्धा राहील, ना व्यवहाराचे नियमन राहणार. खरेदी झाल्यानंतर व्यापारी पळून जातात, या शेतकऱ्यांच्या पैशांची केंद्र सरकार हमी देणार का? हा निर्णय शेतकरीहिताच्या विरोधी आहे. त्यामुळे हा लाक्षणिक संप आहे.

- दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT