विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ. राजेंद्र शिंगणे
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ. राजेंद्र शिंगणे  
मुख्य बातम्या

विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ. राजेंद्र शिंगणे

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये वीजपुरवठा असेल, कमी दाबाचा पुरवठा, जास्त दाबामुळे उपकरणे नादुरुस्त होणे आदी समस्यांचा समावेश आहे. तरी  महावितरण कंपनीने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या विजेबाबत भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढाव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  यांनी दिले . सिंदखेडराजा परिसरातील  विविध गावात महावितरण अंतर्गत वीजपुरवठ्याबाबत डॉ. शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेडराजा पंचायत समिती सभागृहात महावितरण अधिकारी-कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.  बैठकीत विविध गावातील सरपंच, पोलीस पाटील व  शेतकऱ्यांनी आपल्या भागातील विविध समस्या मांडल्या. आढावा बैठकीला तहसीलदार संतोष येवलीकर, कार्यकारी अभियंता श्री. कदम, ॲड. नाझेर काझी,  शिवाजीराजे जाधव, संदीप मेहेत्रे, महावितरणचे अभियंता श्री. माळोदे यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT