Research Centers Should Not Be White Elephants: Nana Patolas 
मुख्य बातम्या

कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू नयेत ः नाना पटोले

टीम अॅग्रोवन

भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो. याकरिता कृषी शास्त्रज्ञांनी मोलाचे प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधन केंद्रे पांढरे हत्ती ठरू नये, असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लाखनी येथे आयोजित शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनात व्यक्‍त केले. 

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, पंचायत समिती सभापती खुशाल गिदमारे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उमेदचे राजेंद्र इंगळे, कृषिभूषण शेतकरी रामचंद्र कापगते, शेषराव निखाडे, यादोराव मेश्राम, डॉ. जी. आर. शामकुवर, भूपेंद्रपालसिंग, आकाश कोरे, ज्ञानेश्‍वर रहांगडाले, तहसीलदार माणिक विराणी, गटविकास अधिकारी धीरज पाटील, कृषी विकास अधिकारी रोहिणी डोंगरे, तालुका कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे, केव्हीकेचे डॉ. एस. एन. वझिरे, सविता तिडके उपस्थित होते. 

नाना पटोले म्हणाले, ‘‘आधुनिक काळामध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्याने खताची सवय होऊन पिकासाठी जमीन मृत झाल्यासारखी झाली आहे. त्याकरिता उपजाऊ जमीन राहण्याकरिता जमिनीची आरोग्यपत्रिका पाहून खतांचा वापर करावा.’’

आजच्या युगात महिला शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होत असून, या वेळी कृषी विभागाच्या वतीने यांत्रिकीकरण योजनेतून ग्राम सावरी येथील ललिता फुलेकर, पोहरा येथील विष्णू गिऱ्हेपुंजे या लाभार्थ्यांना ट्रॅक्‍टरवाटप करण्यात आले. सूत्रसंचालन पदमाकर गिदमारे यांनी केले. सुचित लकडे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात वाळव्यातून १२७६ शेतकऱ्यांच्या हरकती

Paddy Sowing: भोरमध्ये भात पेरणीला वेग

Totapuri Mango: तोतापुरी आंब्याला १५ हजारांचा दर

Rahul Gandhi Demands: धर्मेंद्र प्रधान यांनी युवकांची माफी मागत राजीनामा द्यावा : राहुल गांधी

Petrol Ethanol Blending: इथेनॉल मिश्रित पेट्रोल वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित

SCROLL FOR NEXT