Report crop loss to insurance company within 72 hours 
मुख्य बातम्या

पीक नुकसान ७२ तासांत विमा कंपनीला कळवा

सोलापूर ः नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी स्वत:हून पीकविमा कंपनी वा कृषी विभागास ७२ तासांच्या आत द्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः ‘‘नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी स्वत:हून पीकविमा कंपनी वा कृषी विभागास ७२ तासांच्या आत द्यावी. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील काढणीपश्‍चात नुकसानभरपाई, या जोखमेअंतर्गत नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार आहे’’, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. 

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. चक्रीवादळ, वादळी पाऊस व अवेळी पाऊस यामुळे कापणीनंतर शेतात वाळविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास त्वरित विमा कंपनी, कृषी विभागाला माहिती द्यावी. शेतात पीक कापणी करून सुकविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे कापणीपासून जास्तीत जास्त १४ दिवस विमा संरक्षण प्राप्त आहे.

नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना ७२ तासांच्या आत देणे आवश्यक आहे. ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेचे ॲप, इन्शुरन्स कंपनीचे कंपनीचे ई-मेल-customer.service@bhartiaxa.com, इन्शुरन्स कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, इन्शुरन्स कंपनीचे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय कार्यालय, संबंधित बँकेची शाखा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा’’, असे आवाहन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT