Mahabeez
Mahabeez  
मुख्य बातम्या

अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे आदेश 

टीम अॅग्रोवन

अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने अहवाल दिल्यानंतरही भरपाईस नकार देणाऱ्या ‘महाबीज’ला अमरावती ग्राहक तक्रार निवारण मंचाने चपराक दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्याकरीता ६१ हजार रुपये व त्यावर तक्रार दाखल तारखेपासून १० टक्के व्याज तसेच १५ हजार रुपये शारीरीक व मानसिक त्रासाकरीता व १० हजार रुपये तक्रारीचा खर्च म्हणून महाबीज व बियाणे विक्रेता बोंडे ॲग्रो सर्व्हिसेस यांना देण्याचे आदेशित केले आहे. 

अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुदाम देशमुख व सदस्या श्रीमती शुभांगी कोंडे यांनी तक्रारकर्ता विनोद ठाकरे यांना ही भरपाई देण्याचे आदेश दिले.  अंजनगावसूर्जी येथील तक्रारकर्ता विनोद ठाकरे यांनी आपल्या शेतात पेरण्याकरीता बोंडे ॲग्रो सर्व्हिसेस यांच्याकडून महाबीज व्दारा उत्पादित सोयाबीनचे बियाणे विकत घेतले होते. या बियाणाची पेरणी ठाकरे यांनी शेतामध्ये केली. पण उगवणशक्‍ती कमी असल्याने रोप बहुतांशी उगवलीच नाही. त्यामुळे शेतकरी ठाकरे यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे सोयाबीन बियाणाच्या उगवणशक्ती विषयक तक्रार दाखल केली. तत्कालीन कृषी अधिकारी यांनी शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे समिती स्थापन करून तक्रारकर्त्याच्या शेताची पाहणी करून पंचनामा केला. कृषी अधिकारी यांच्या समितीमध्ये कृषीतज्ज्ञ यांचा देखील समावेश असल्याने पंचनाम्यामध्ये महाबीज व्दारानिर्मीत सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. 

तक्रारकर्त्यांचे वकील ॲड.डॉ. रविंद्र मराठे यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून अमरावती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुदाम देशमुख व सदस्या श्रीमती शुभांगी कोंडे यांनी शेतकरी विनोद ठाकरे यांना महाबीज व बोंडे ॲग्रो सर्व्हिसेस यांनी निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे विकल्याबद्दल पिकाची नुकसान भरपाई रक्कम ६१हजार रुपये त्यावर तक्रार दाखल तारखेपासून १० टक्के व्याज तसेच १५ हजार रुपये रुपये शारीरीक व मानसिक त्रासाकरीता व १० हजार रुपये तक्रारीचा खर्च म्हणून देण्याचे आदेशित केले आहे. 

तक्रारकर्त्यांचा युक्तिवाद केला मान्य  शेतकरी ठाकरे यांनी महाबीजला कायदेशीर सूचना देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. पण महाबीजने कायदेशीर सूचनेला उत्तर देऊन शेतकऱ्याचा दावा नाकारला. त्यामुळे त्यांनी ॲड. डॉ. रवींद्र उल्हास मराठे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अमरावती यांच्याकडे बोंडे ॲग्रो सर्व्हिस व महाबीज यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. महाबीजतर्फे ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये आपला लेखी जबाब दाखल करुन शेतकऱ्याचा दावा नाकारण्यात आला. तक्रारकर्त्यातर्फे ॲड. डॉ. रविंद्र मराठे यांनी युक्तिवाद करून महाबीजने उत्पादित केल्यामुळे तसेच बोंडे ॲग्रो सर्व्हिसेस यांनी तक्रारकर्त्याला निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे विकून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचा युक्तिवाद केला. तक्रारकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राहक मंचाने मान्य केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT