स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकर यांचा राजीनामा 
मुख्य बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकर यांचा राजीनामा

टीम अॅग्रोवन

अकोला ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा व संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे पाठविला आहे. तुपकरांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघटनेला सोडचिठ्ठी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संघटनेचे युवानेते, मुलुख मैदानी तोफ म्हणून तुपकरांची राज्यभर ओळख बनली होती. त्यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणाने दिला की राजकीय, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीची कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत आघाडी झालेली असून योग्य मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने तुपकरांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तुपकरांना बुलडाणा जिल्ह्यात तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती. याठिकाणी त्यांच्यासाठी सोयीचे असलेले चिखली, बुलडाणा हे दोन्ही मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात असून तेथे पक्षाकडून दोन्ही विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी रविकांत तुपकर यांना थांबविण्यात आले होते. २०१४ च्या निवडणुकीतही त्यांना थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. पुन्हा या वेळी उमेदवारीसाठी थांबण्याचा सल्ला मिळण्याचीच चिन्हे दिसत असल्याने त्यांनी ही भूमिका घेतली असावी, असा कयास लावल्या जात आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून तुपकर हे नॉट रिचेबल आहेत. ते भाजपमध्ये जात असल्याच्या बातम्या सोशल मीडियात झळकल्या सुद्धा. मात्र, संपर्क न झाल्याने त्यांच्या भूमिकेबाबत कुठलाही खुलासा झालेला नाही. गुरुवारी (ता. २६) त्यांच्या अधिकृत ईमेलवरून माध्यमांना राजीनामा प्राप्त झाला. अद्यापही त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. कदाचित दोन दिवसांत त्यांच्या या राजीनाम्याचे कारण समोर येईल, असे सांगितले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Management: उत्पादकता वाढीसाठी संतुलित खत व्यवस्थापन गरजेचे : कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या बदलासाठी प्रयत्न करू

DAP Fertilizer Shortage: पेरणीच्या तोंडावर डीएपी खताचा तुटवडा

Fake Seeds Karvai: सात लाखांचे अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Cotton Revolution: ‘कपास क्रांती’ प्रात्यक्षिकांसाठी ऑनलाइन अर्ज करा

SCROLL FOR NEXT