दुष्काळाने केळी रोपांच्या उठावास `ब्रेक`
दुष्काळाने केळी रोपांच्या उठावास `ब्रेक` 
मुख्य बातम्या

दुष्काळाने केळी रोपांच्या उठावास `ब्रेक`

Raj Chougule

कोल्हापूर : दुष्काळी परिस्थितीचा फटका केळी लागवडीला बसला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांमधून आगावू बुकिंग करूनदेखील शेतकऱ्यांनी रोपे नेली नसल्याने याचा फटका रोपवाटिका धारकांना बसला आहे. 

मार्च ते मे या दरम्यान राज्यभरात राम बाग केळी लागवड केली जाते. यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात केळी रोपांना मागणी असते. यंदाही मार्चपूर्वी राज्यभरातील शेतकऱ्यांनी केळी रोपांची मागणी नोंदविली. यानुसार रोपवाटिका चालकांनीही शेतकऱ्यांना वेळेत रोपे देण्यासाठी रोपे तयार करण्याचे काम सुरू ठेवले.

मार्चच्या सुरवातीपासून शेतकरी रोपवाटिकांतून केळी रोपे नेण्यास प्रारंभ करतात. परंतु, यंदा मार्चपासूनच पाणीटंचाई निर्माण होण्यास प्रारंभ झाला. पश्‍चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांतून प्रामुख्याने नांदेड व जळगाव परिसरात हजारो रोपे लागवडीसाठी जातात. परंतु, यंदा या भागात उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. साधारण: केळी लागवडीसाठी ३८ अंश सेल्‍सिअसपेक्षा कमी तापमान लागते. परंतु, तापमानाने चाळिशी ओलांडल्याने केळी लागवड करणे कठीण बनले आहे. 

रोपवाटिका चालकांनी शेतकऱ्यांशी संपर्क करूनही शेतकरी रोप नेण्यासाठी तयार नसल्याचे रोपवाटिका उद्योगातील सूत्रांनी सांगितले. पाणी नसल्याने केळी लागवड करू शकत नसल्याची हतबलता केळी उत्पादकांनी व्यक्त केल्याने रोपवाटिका चालकांचीही पंचाईत झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत दहा टक्केही रोपांची विक्री झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

पावसाळाच ठरणार आधार

आता शेतकऱ्यांना पावसाळ्याशिवाय दुसरा आधार  नाही. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून काही प्रमाणात मागणी असली, तरी इतर ठिकाणांहून मात्र रोपांची मागणी ठप्प आहे. आगाऊ मागणी केलेली रोपे कधी शेतकऱ्यांकडून घेतली जातील, याचे उत्तर रोपवाटिका चालकांकडे नाही. बहुतांशी शेतकरी १५ मे नंतर (मृग बहार) केळीची लागवड करतात. पण, यंदाही पावसाळा वेळेत सुरू न झाल्यास ही शक्‍यताही धूसर आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT