मुख्य बातम्या

पावसामुळे जिनिंग उद्योगावर संकट

टीम अॅग्रोवन

बोदवड, जि. जळगाव  : अतिपावसाने कपाशी पिकाला फटका बसल्याने हंगाम लांबला आहे. परिपक्व बोंडे झालेल्या कपाशी पिकाचेही नुकसान अधिक झाल्याने वेचणी हवी तशी सुरू नाही. बोंडांचा दर्जाही चांगला नाही. यामुळे दसरा सण साजरा झाला तरीदेखील बोदवड व परिसरातील जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये कापसाची हवी तशी आवक नाही. यामुळे जिनिंगमधील काम बंदच आहे.  मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड हे तालुके कपाशी लागवडीसाठी ओळखले जातात. जूनच्या सुरवातीला लागवड झालेल्या कपाशीच्या पिकात बोंडे परिपक्व झाली आहेत. झाडावर खालील बाजूस लागलेली बहुतांश बोंडे सततच्या पावसामुळे काळवंडली आहेत. यामुळे दिवाळीपर्यंत चांगल्या दर्जाचा कापूस येण्याची शाश्वती नाही. झाडांवर लागणाऱ्या फुले, पात्यांची गळतीही होत आहे. दसरा सणालाच अनेक जिनिंग कारखान्यांमध्ये कापूस येतो. आवक सुरू झाली, की जिनिंगचे काम सुरू होते. बोदवड तालुका कपाशी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्‍यात जिनिंग मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच कपाशीच्या सरकीवर प्रक्रिया करणारे अनेक लहान-मोठे उद्योग या ठिकाणी आहेत. येथील कपाशीला देश-विदेशांत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तालुक्‍यातील जिनिंग उद्योगाची व्याप्ती लक्षात घेता, अनेकांना यापासून रोजगार मिळतो. हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाह कपाशी उद्योगावर चालतात. या वर्षी पाऊस समाधानकारक असल्याने मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड करण्यात आली, त्यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. असे असताना मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सप्टेंबर व या महिन्यातील पावसामुळे कापसाच्या कैऱ्या या झाडावरच सडत आहेत. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट येणार आहे. याचा परिणाम जिनिंग उद्योगावर होऊन आवक घटली आहे. तालुक्‍यातील जिनिंगमध्ये दरवर्षी गणेश चतुर्थीला कापूस खरेदीला सुरुवात केली जाते. वर्षभरात किमान आठ महिने तरी जिनिंग सुरू असल्याने अनेकांना रोजगार मिळतो. या वर्षी पावसामुळे कापूस निघण्यास उशीर झाला आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे, तरीही कापसाची हवी तशी आवक नसल्याने खरेदीदार, मजुरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

दरवर्षी दसऱ्यापर्यंत दोन हजार क्विंटल कापसाची आवक होते. परंतु, या वर्षी पाऊस जास्त असल्याने फक्त पाचशे ते सहाशे क्विंटल कापसाची आवक आहे. जास्त पावसामुळे कपाशीच्या कैऱ्या काळ्या पडत आहेत. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. यामुळे जिनिंग व्यवसाय एक ते दीड महिना उशिराने सुरू होईल.  - अरविंद जैन,  जिनिंग प्रेसिंग कारखानदार, बोदवड (जि. जळगाव)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT