Rain in Vidarbha, Marathwada; The minimum temperature will remain average 
मुख्य बातम्या

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस; किमान तापमान सरासरीइतके राहणार 

राज्याच्या विविध भागांत पावसाला पोषक हवामान होत असल्याने कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ-घट होत आहे. १३ जानेवारीपर्यंतच्या आठवड्याच्या कालावधीत राज्याचे किमान तापमान सरासरी इतके, तर बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या विविध भागांत पावसाला पोषक हवामान होत असल्याने कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ-घट होत आहे. १३ जानेवारीपर्यंतच्या आठवड्याच्या कालावधीत राज्याचे किमान तापमान सरासरी इतके, तर बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.  गेल्या आठवडाभरात राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान आणि पहाटेच्या वेळी धुके अनुभवायला मिळाले. सध्या राज्याच्या अनेक भागांत हवामान ढगाळ होत असून, धुक्याबरोबरच दवही पडत आहे. १३ जानेवारीपर्यंत विदर्भात सर्वदूर, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.      राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागांत थंडी गायब झाली आहे. १३ जानेवारीपर्यंतच्या काळात राज्याचे वाढलेले किमान तापमान पुन्हा सरासरीवर येण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्राचा भाग वगळता उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ६ अंशांनी घट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT