Rain with stormy winds in Kolhapur
Rain with stormy winds in Kolhapur 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी चारनंतर बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, आजरा परिसरात प्रामुख्याने पावसाने हजेरी लावली. कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील श्रीवर्धन बायोटेकचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. तर, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी ज्वारी, गव्हाच्या मळण्यांना या पावसाचा फटका बसला. काजू बागांनाही दणका बसला. अचानक आलेल्या पावसामुळे गवत गंजीसह जळणाचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांची धांदल उडाली. 

कोंडिग्रेसह जांभळी आणि यड्राव येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने नारळ, बदाम, बाभळीची झाडेही उन्मळून पडली. रविवारी दुपारी सुमारे दीड तास सोसाट्याचा वारा आणि गारपीट सुरू झाली. वाऱ्याने मोठमोठी झाडे मार्गावर उन्मळून पडली. काही ठिकाणी रस्ते बंद झाले. शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या श्रीवर्धन बायोटेकचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले. 

अनेक घरांवरील पत्रेही उडून गेले. जनावरांच्या गोठ्याचेही नुकसान झाले. पिकांसह भाजीपाल्याचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुमारे दीड तास पाऊस बरसला. जयसिंगपूर शहरातही रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे पिकांची हानी होण्याची शक्‍यता आहे. 

कलिंगड, आंब्याला धोका 

गडहिंग्लज आजरा तालुक्‍यात उशिरा पेरणी केलेले शाळू पीक आता कापणीला आले असून ते पावसात भिजले. पावसाने ज्वारी काळी पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी गारा पडल्याने कलिंगड, आंब्याच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT