Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

बुधवारपर्यंत पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे ः ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली असली तरी कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. अशीच स्थिती तीन दिवस राहणार असून राज्यातील अनेक भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भ व परिसर आणि मध्य प्रदेश या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तर कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच तमिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टी परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील अनेक भागात कमीअधिक प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. यामुळे शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर येथे ३७.५ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे.  रविवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३२.३ 
  • अलिबाग २९.७ 
  • रत्नागिरी ३२.२ 
  • डहाणू ३२.४ 
  • पुणे ३५.८ 
  • जळगाव ३७.२ 
  • कोल्हापूर ३६.५ 
  • महाबळेश्वर ३१.१ 
  • नाशिक ३४.५ 
  • सांगली ३६.४ 
  • सातारा ३५.१ 
  • सोलापूर ३७.५ 
  • औरंगाबाद ३४.२ 
  • परभणी ३५.१ 
  • नांदेड ३७.० 
  • अकोला ३६.५ 
  • अमरावती ३५.० 
  • बुलडाणा ३३.८ 
  • चंद्रपूर ३३.० 
  • गोंदिया ३३.५ 
  • नागपूर ३४ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

    Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

    Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

    Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

    Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

    SCROLL FOR NEXT