Hawaman_web_2_153_12_99.jpg 
मुख्य बातम्या

काही भागांत पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांत पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत असताना उकाड्यात चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांत पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत असताना उकाड्यात चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. पुढील काही दिवस उन्हासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोमवारी (ता.२४) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात मॉन्सून दाखल होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राज्यात वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. ढगाळ वातावरण आणि पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. तर, मध्यरात्रीनंतर हवेत गारवा तयार होत असल्याने पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत आहे. मात्र, दिवसभर काही ठिकाणी उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात चढउतार होत आहे.

मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअस, तर विदर्भात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. कोकण व मराठवाड्यातील बहुतांशी भागात तापमान सरासरीच्या जवळपास आहे. तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यातील उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या चांगल्याच सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी जोरदार वारे वाहत असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून खरिपाची पूर्व तयारी सुरू असल्याने पूर्वमोसमी पावसामुळे अडथळे निर्माण होत आहेत. राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस मंगळवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, संपूर्ण मराठवाडा बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा गुरूवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ शुक्रवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सोमवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

  • मुंबई (सांताक्रुझ) ३३.८
  • अलिबाग ३२.९
  • रत्नागिरी ३३.६
  • डहाणू ३३.२
  • पुणे ३५.३
  • जळगाव ३९.४
  • कोल्हापूर ३४.०
  • महाबळेश्वर २७.५
  • मालेगाव ३५.६
  • नाशिक ३२.७
  • सांगली ३५.६
  • सातारा ३५.७
  • सोलापूर ३८.५
  • औरंगाबाद ३७.३
  • परभणी ४०.०
  • नांदेड ४१.५
  • अकोला ४०.०
  • अमरावती ३८.८
  • बुलडाणा ३८.०
  • ब्रम्हपुरी ४२.५
  • चंद्रपूर ४२.०
  • गोंदिया ३९.८
  • नागपूर ३९.९
  • वर्धा ३९.२
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Iran US War: युद्धाचा पेच अधिक गडद

    Kukadi Project: कुकडी प्रकल्पात ४० टक्के साठा

    Satpura Hills: सातपुडा पर्वताची वाटचाल बोडकेपणाकडे

    AI In Agriculture: ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चा नेब्रास्का विद्यापीठाशी करार

    Dr. Jaysingrao Pawar passed away: ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

    SCROLL FOR NEXT