कोकणात पावसाची शक्यता 
कोकणात पावसाची शक्यता  
मुख्य बातम्या

कोकणात पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाच्या पट्याचा प्रभाव कमी झाला झाल्याने कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. येत्या चार ते पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

कोकणात असलेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकले आहे. या भागात चक्रीय स्थिती असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तसेच कर्नाटक किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच मॉन्सूनचा ट्रफ बिकानेर, अजमेर परिसरात असून या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र मध्य प्रदेश परिसर, दाल्तोगंज, जमशेदपूर ते त्रिपुरा या दरम्यान आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तर भाग व परिसरातही येत्या बुधवारी पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडून बाष्प खेचले जाण्याचा अंदाज असल्याने राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

राज्यात होत असलेल्या कमीअधिक पावसामुळे हवेत चांगलाच गारवा तयार झाला आहे. त्यामुळे कमाल तापमानासह किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. रविवार (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर येथे ३२.१ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.  येथे होणार जोरदार पाऊस  सोमवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर  मंगळवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  गुरुवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २९.१ (१.१) 
  • जळगाव - ३१.७ (-०.६) 
  • कोल्हापूर - २६.२ (-०.६) 
  • महाबळेश्‍वर - १९.९ 
  • मालेगाव - ३०.२ (-०.७) 
  • नाशिक - २७.५ (-१) 
  • सांगली - २४.२ (-४.५) 
  • सातारा - २६.९ 
  • सोलापूर - ३२.१ (०.२) 
  • मुंबई (कुलाबा) - ३१.८ (१.९) 
  • अलिबाग - ३१.७ (१.५) 
  • रत्नागिरी - ३०.२ (१.३) 
  • डहाणू - ३२ (१.४) 
  • औरंगाबाद - ३१.२ (१.४) 
  • परभणी - ३१.३ (-०.१) 
  • बीड- २६.५ (-३.०) 
  • अकोला - २९.८ (-१.९), 
  • अमरावती - २७ (-३.३) 
  • बुलडाणा - ३१ (२.५) 
  • ब्रम्हपुरी - २८.२ (-२.२) 
  • चंद्रपूर - ३०.४ (-०.८) 
  • गोंदिया - २९.४ (-१.८) 
  • नागपूर - २९ (-२) 
  • वर्धा - २८.८ (-१.९) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT