Hawaman
Hawaman 
मुख्य बातम्या

मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. आज (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर; तर बुधवारी (ता. २५) चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

अरबी समुद्रात असलेले कमी तीव्र दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील काही भागांत हवामान कोरडे झाले आहे. दोन ते तीन दिवसांपासून कमी झालेली थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढली असल्याने काही भागात चांगलाच गारठा वाढला आहे. यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. शनिवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक येथे १५.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

दोन दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्र व परिसरात चक्रीय स्थिती अजूनही कायम आहे. राज्यातील काही भागांत अजूनही अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात चढ-उतार झाले आहेत. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक असले तरी नाशिक, नगर, जळगाव महाबळेश्‍वर या भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. यामुळे या भागांत काहीसा गारवा असल्याने बोचरी थंडी असल्याची स्थिती आहे. 

विदर्भात काही अंशी कोरडे वातावरण असल्याने किमान तापमान १७ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर गोंदिया, अमरावती, बुलडाणा या परिसरांत १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. मराठवाड्यातही किमान तापमानाचा पारा १९ ते २१ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात चढ-उतार असून, १५ ते २१ अंश सेल्सिअसच्या तापमान आहे. कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे. यामुळे या भागात २१ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे.  शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) २०.५ (-१), अलिबाग २१.५ (१), ठाणे २४, रत्नागिरी २३.५ (२), डहाणू २१.४, पुणे १९.३ (५), जळगाव १९ (५), कोल्हापूर २१.४ (४), महाबळेश्‍वर १७.१ (३), मालेगाव १७.६ (३), नाशिक १५.९ (२), निफाड १७.६, सांगली १८.६ (१), सातारा २१.५ (६), सोलापूर १८.६ (१), औरंगाबाद २०.३ (६), परभणी १९.६ (३), परभणी कृषी विद्यापीठ १९.०, नांदेड २१.० (५), उस्मानाबाद २१.० (६), अकोला २० (५), अमरावती १७.९ (१), बुलडाणा १७.६ (१), चंद्रपूर १८.० (३), गोंदिया १७.८ (२), नागपूर २१.२ (६), वर्धा १९.९ (४), यवतमाळ २१.५ (६). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT