राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यता
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या प्रवाहात होत असलेले बदल यांमुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. निफाड (जि. नाशिक) येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी (ता. १७) राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान होत असल्याने बुधवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली अाहे.  दोन दिवस तापमानात घट झाल्याने राज्याच्या उत्तर भागात गारठा चांगलाच वाढला होता. निफाड येथे तापमान ६ अंशांपर्यंत घसरले होते. तर राज्यात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली आले आहे. सोमवारी (ता. १७) राज्याच्या किमान तापमानात होऊ लागल्याचे दिसून आले आहे. नगर येथे ९.४ अंश, धळे येथील कृषी महाविद्यालयात १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात तापमानात घट झाली असून, नागपूर येथे पारा १० अंशांवर आला. उर्वरित राज्यात किमान तापमानात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळी उन्हाच्या चटक्यासह उकाडाही वाढला आहे.   बुधवारी (ता. २०) आणि गुरुवारी (ता. २१) पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड, तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता. १८) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.८ (-०.६), नगर ९.४(-४.५), जळगाव १२.२(-२.७), कोल्हापूर १४.९ (-१.८), महाबळेश्‍वर १४.८(०.६), मालेगाव १३.४(०.७), नाशिक ११.१ (-०.६), सांगली १३.४(-२.६), सातारा १३.०(-१.५), सोलापूर १६.७(-१.७), सांताक्रुझ १५.६(-२.९), अलिबाग १६.६(-१.९), रत्नागिरी १६.६(-२.८), डहाणू १६.२(-२.३), आैरंगाबाद १३.२(-१.६), नांदेड १४.० (-१.०), परभणी १५.०(-१.६), अकोला १३.६(-३.१), अमरावती १२.६(-४.६), बुलडाणा १४.४ (-२.६), ब्रह्मपुरी १२.५ (-३.७), चंद्रपूर १५.८(१.७), गोंदिया १२.२(-३.८), नागपूर १०.१(६.१), वर्धा १३.०(-३.३), यवतमाळ १३.०(-४.७).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT