राज्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची शक्यता
राज्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची शक्यता  
मुख्य बातम्या

राज्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. उद्यापर्यंत (ता. २५) राज्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.  बंगालच्या उपसागात म्यानमारच्या दक्षिणभागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहेत. तर मंगळवारी (ता. २३) उत्तर महाराष्ट्रापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. तापमानात वाढ झाल्याने अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने मराठवाड्यासह, दक्षिण मध्य महाराष्ट्र, काेकणात अंशत: ढगाळ हवामान होते. आज (ता. २४) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम असून, रात्रीच्या किमान तापमान कमी-अधिक होत आहे. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अमरावती येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर रात्रीच्या तापमानात झाल्याचे दिसून आले. नाशिक येथे नीचांकी १५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.३ (१८.६), नगर -(१८.०), जळगाव ३७.० (१८.०), कोल्हापूर ३३.२ (२१.९), महाबळेश्‍वर २८.० (१७.५), मालेगाव ३५.८ (१८.४), नाशिक ३५.२ (१५.१), सांगली ३४.३ (१९.९), सातारा ३३.६ (१९.४), सोलापूर ३५.१ (२३.३), सांताक्रूझ ३५.७ (२१.४), अलिबाग ३३.८ (२२.४), रत्नागिरी ३५.२ (२३.५), डहाणू ३३.३ (२०.९), आैरंगाबाद ३५.२ (१७.०), परभणी ३६.२ (१८.०), नांदेड ३६.० (२१.०), उस्मानाबाद -(१७.७), अकोला ३७.१ (१८.८), अमरावती ३७.२ (१८.६), बुलडाणा ३२.५ (१९.६), चंद्रपूर ३५.६ (२३.२), गोंदिया ३५.८ (२०.०), नागपूर ३६.५ (१५.६), वर्धा ३६.६ (१७.६), यवतमाळ ३६.५ (१८.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT