Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

जोरदार पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचे रूपांतर चक्रीय वाऱ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण तयार झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण बनत आहे. पुढील पाच ते सहा मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. तर विदर्भ व कोकण काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. काही भागांत आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढत असल्याने कमी झालेला पारा पुन्हा वाढला आहे. काही भागांत ढगाळ वातावरण असले, तरी उन्हाच्या चटक्यामुळे उकाडा वाढला आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. ७) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. पुढील काही दिवस कमाल तापमान कमीअधिक राहणार आहे. 

उत्तर कर्नाटक व परिसर ते दक्षिण केरळ व किनारपट्टी दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीय वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच गुजरातच्या उत्तर भागातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तर पूर्व पश्‍चिम असलेल्या मध्य प्रदेश ते त्रिपुरा, झारखंड, पश्‍चिम बंगालदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्राचा आग्नेय भाग आणि मालदिव परिसरात चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.  राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  शनिवार ः पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद व जालना हे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र,  रविवार ः पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया हे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र,  सोमवार ः मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ हे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र  मंगळवार ः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, बीड, जालना, औरंगाबाद, वगळता संपूर्ण महाराष्ट्र  शुक्रवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३४.२ 
  • अलिबाग ३३.३ 
  • रत्नागिरी ३४.४ 
  • डहाणू ३४.२ 
  • पुणे ३८.२ 
  • जळगाव ४१.९ 
  • कोल्हापूर ३५.३ 
  • महाबळेश्‍वर २९.७ 
  • मालेगाव ४०.८ 
  • नाशिक ३७.४ 
  • सांगली ३५.९ 
  • सातारा ३६.६ 
  • सोलापूर ३९.६ 
  • औरंगाबाद ३९.३ 
  • परभणी ४०.१ 
  • नांदेड ४०.५ 
  • अकोला ४३.४ 
  • अमरावती ४१ 
  • बुलडाणा ३९.६ 
  • ब्रह्मपुरी ४१.३ 
  • चंद्रपूर ४१.८ 
  • गोंदिया ४१ 
  • नागपूर ४१ 
  • वाशीम ४०.४ 
  • वर्धा ४२.५ 
  • यवतमाळ ४२.७ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT