Of rain-fed fields Khandalakar will build the dam 
मुख्य बातम्या

अतिवृष्टिग्रस्तांच्या शेतांची बांधबंदिस्ती करणार खंडाळाकर

सातारा : महाबळेश्‍‍वर तालुक्‍यातील ८१ गावांतील शेतीचक्र गतिमान करण्‍यासाठी खंडाळा येथील ८४ जेसीबीधारकांनी जिल्‍हा प्रशासनाने केलेल्‍या आवाहनास प्रतिसाद दिला. हे जेसीबीचालक नुकसानग्रस्त शेतांची बांधबंदिस्‍ती करण्‍याचे काम करणार आहेत.

टीम अॅग्रोवन

सातारा : जिल्ह्यात झालेल्‍या अतिवृष्‍टीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. अतिवृष्‍टीमुळे पाटण, महाबळेश्‍‍वर आणि वाई तालुक्यांत मोठ्या प्रमाणात जीवित, वित्तहानी झाली. त्‍या ठिकाणचे अर्थ आणि शेतीचक्र धोक्‍यात आले. यापैकी महाबळेश्‍‍वर तालुक्‍यातील ८१ गावांतील शेतीचक्र गतिमान करण्‍यासाठी खंडाळा येथील ८४ जेसीबीधारकांनी जिल्‍हा प्रशासनाने केलेल्‍या आवाहनास प्रतिसाद दिला. हे जेसीबीचालक नुकसानग्रस्त शेतांची बांधबंदिस्‍ती करण्‍याचे काम करणार आहेत. 

जिल्‍ह्यात यंदाच्‍या हंगामात जुलै महिन्‍यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे काही दिवस जिल्ह्याच्‍या पश्‍‍चिम भागातील जनजीवन विस्‍कळित झाले होते. पावसाच्‍या थैमानामुळे झालेल्‍या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच पुन्‍हा नोव्‍हेंबर आणि डिसेंबर महिन्‍यात अतिवृष्‍टीचा कहर सुरू झाला. यामुळे जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्‍यांना मोठा फटका बसला. अतिवृष्‍टीचा सर्वाधिक फटका महाबळेश्‍‍वर तालुक्‍यातील ८१ गावांना बसला होता.

अतिवृष्‍टीतील नुकसानीचा पंचनामा करत शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्‍ताव जिल्‍हा प्रशासनाने पाठवला. निधी उपलब्‍ध होईपर्यंत शेतकऱ्यांना सावरण्‍यासाठी पुढे येण्‍याचे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने खंडाळा तालुक्‍यातील व्‍यावसायिकांना केले होते. त्यानुसार अनेक व्‍यावसायिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत प्रशासनास आणि महाबळेश्‍‍वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना शेतीसुधारणेसाठी लागणारी मदत देण्‍याचे जाहीर केले. 

‍सद्य:स्‍थितीत ८४ जेसीबी, दहा पोकलेन, सहा डंपर आणि चार ट्रॅक्‍टरचालक-मालक मदत कामासाठी पुढे आले आहेत. या यंत्रणेसाठी लागणारे इंधन जिल्‍हा प्रशासन पुरविणार आहे. या यंत्रणेचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्‍या हस्‍ते नुकतेच लोकार्पण करण्‍यात आले. खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी पुढाकार घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT