crop damage
crop damage 
मुख्य बातम्या

औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस 

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७ मंडळात शनिवार (ता २८) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात अवकाळी पावसाने काही ठिकाणी वादळ तर काही ठिकाणी गारपीटसह पावसाने हजेरी लावली. 

गत काही दिवसापासून मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. शुक्रवारी (ता २७) दुपारनंतर बदललेल्या वातावरणाने सायंकाळी पुर्वमोसमी पावसाच्या रुपात औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनुक्रमे ३९ व २८ मंडळात हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील पाऊस झालेल्या ३९ मंडळात औरंगाबाद तालुक्यात येत असलेल्या आठ मंडळांसह पैठणमधील सात, गंगापूर मधील नऊ, वैजापुर, कन्नड, खुलताबाद प्रत्येकी दोन सिल्लोड मधील चार, सोयगाव मधील दोन व फुलंब्री तालुक्यातील तीन मंडळात कमी-अधिक प्रमाणात वादळासह अवकाळी पाऊस झाला. 

गंगापुर तालुक्यातील गंगापूर मंडळात सर्वाधिक ४१ मिलिमीटर तर त्यापाठोपाठ याचं तालुक्यातील वाळुज मंडळात २४.५० मिलिमीटर, फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री मंडळात २०.२५ मिलिमीटर तर औरंगाबाद तालुक्यातील कांचनवाडी मंडळात १४.२५ मिलिमीटर, भावसिंगपुरा मंडळात २९.३० मिलिमीटर तर औरंगाबाद मंडळात १२.२५ मिलिमीटर पावसाची नोंद घेतली गेली. इतर मंडळात०.२५ ते ७ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद घेतली गेली. जिल्ह्यात सरासरी ३.९६ मिलिमीटर पाऊस झाला. काही ठिकाणी वादळामुळे घरावरील टिनपत्रेही उडून गेल्याची घटना घडली. 

जालना जिल्ह्यातही अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात जालना जिल्ह्यातील २८ मंडळात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सहा, जाफराबाद तालुक्यातील चार, जालना तालुक्यातील ५, अंबड तालुक्यातील पाच, बदनापूर तालुक्यातील तीन, घनसावंगी व परतूर तालुक्यातील प्रत्येकी एक तर मंठा तालुक्यातील तीन मंडळात अवकाळी पाऊस झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

SCROLL FOR NEXT