रघुनाथदादा पाटील 
मुख्य बातम्या

जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी शहामृगाची भूमिका घेऊ नये ः रघुनाथदादा पाटील

टीम अॅग्रोवन

पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या निधीवर चालणाऱ्या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंका लुटल्या जात असताना शिखर बॅंकेने नेमके काय केले, याचा खुलासा प्रशासकांनी करावा. विद्याधर अनास्कर यांनी शहामृगाची भूमिका घेऊ नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. 

श्री. पाटील म्हणाले, की बॅंकांनी केवळ मलिदा खाण्याचे काम केले. मात्र, बॅंका बुडत असताना वेळोवेळी शिखर बॅंकेने काय केले हे कधीही शेतकऱ्यांना सांगितले नाही. शिखर बॅंकेचे प्रशासक म्हणून विद्याधर अनास्कर यांनी केवळ शहामृगासारखे जमिनीत डोके खूपसून बसू नये. जिल्हा बॅंकांना जाब विचारण्याची तसेच त्यांना शेतकरीभिमुख चांगला कारभार करण्यासाठी दबाव टाकण्याची जबाबदारी रिझर्व्ह बॅंक, नाबार्ड, सहकार खात्याप्रमाणेच शिखर बॅंकेची देखील आहे. 

सहकार विभाग आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे गावांमधील सोसायट्या संपल्या. सोसायट्यांमधील शेकडा दहा रुपयांचे शेअर गोळा केले गेले. हा पैसा जिल्हा बॅंकांकडे गेला. या बॅंकांना पुन्हा शासन, नाबार्ड आणि ठेवीच्या रूपाने पैसा मिळत गेला. त्यातून बॅंकांचा कारभार सुरू झाला. मात्र, भ्रष्ट पुढाऱ्यांनी बॅंका संपविल्या. त्यामुळे पतपुरवठ्याची साखळी तुटली. शेतकरी सावकाराच्या दारात गेले. कर्ज तगाद्यामुळे अपमान सहन न झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा स्थितीतही शिखर बॅंक गप्प कशी, असा सवाल श्री. पाटील यांनी उपस्थित केला.

भाजप सरकारदेखील जिल्हा बॅंकांबाबत दुटप्पी आहे. कारण, विदर्भात भाजपची चलती असताना तेथील बॅंका आजारी कशा पडल्या. नगर, उस्मानाबाद, लातूर या जिल्हा बॅंकांची वाईट स्थिती कशी झाली. या बॅंकांमधील गैरव्यवहाराची चौकशी न करता त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन भाजपने पवित्र करून घेतले आहे, असा आरोप श्री. पाटील यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Agriculture Commissioner Suraj Mandhare : धोरणात्मक बदलामुळे गुणनियंत्रण होणार प्रभावी

Wildlife Conflict: वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची मान फासात

Environmental Management: इरिओफाइड कोळीचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन

Agarbatti Business: अगरबत्ती उद्योगात तयार केला ब्रॅण्ड

Mission Jalbandhu: रोजगार, जलसुरक्षितेसाठी ‘मिशन जलबंधू’

SCROLL FOR NEXT