मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी बियाणे उपलब्ध
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी बियाणे उपलब्ध 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी बियाणे उपलब्ध

टीम अॅग्रोवन

परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी एकाच ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होते. हे टाळण्यासाठी यंदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेले रब्बी पिकांचे बियाणे त्या त्या भागातील शेतकऱ्यांना खरेदी करता यावे यासाठी मराठवाडा विभागातील सर्व आठ जिल्ह्यांमधील विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित विविध रब्बी पिकांच्या बियाणे विक्रीचा प्रारंभ दरवर्षी मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी आयोजित रब्बी पीक शेतकरी मेळाव्यामध्ये होत असतो. परंतु यंदा कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदाचा रब्बी शेतकरी मेळावा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. पूर्वी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विद्यापीठाने उत्पादित केलेले हरभरा, करडई, गहू, जवस, सूर्यफूल, रब्बी ज्‍वारी आदी पिकांच्‍या विविध वाणांच्या बियाण्याची खरेदीची सुविधा केवळ परभणी येथील मुख्‍यालयी ठेवली जात असे.  शेतकरी रांगा लावून बियाणे खरेदी करतात. परंतु कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांच्या संकल्पनेतून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागातील प्रत्‍येक जिल्ह्यातील विद्यापीठांतर्गतची कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय आदी ठिकाणी करण्‍यात येणार आहे. कृषी विद्यापीठातील परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्र तसेच विद्यापीठ अंतर्गतचे औरंगाबाद, बदनापुर (जि.जालना), खामगांव (जि.बीड), तुळजापुर (जि.उस्‍मानाबाद) येथील कृषी विज्ञान केंद्रे तसेच लातूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, गोळेगांव(जि.हिंगोली) येथील कृषी महाविद्यालय या ठिकाणी बियाणे विक्रीसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन बियाणे खरेदी करावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

पीकनिहाय बियाणे दर

पीक   वाण दर प्रतिकिलो  प्रतिबॅग  वजन (किलो) प्रतिबॅगचे  दर 
हरभरा   बीडिएनजी-७९७ (आकाश)  ७५ रुपये   १०   ७५० रुपये
हरभरा  बीडिएनजीके-७९८  १०० रुपये   १०    १००० रुपये
करडई पीबीएनएस-१२ (परभणी कुसुम) ९० रुपये  ५     ४५० रुपये
करडई   पीबीएनएस-८६ (पूर्णा)   ९० रुपये  ५   ४५० रुपये
ज्वारी  एसपीव्ही-१४११ (परभणी मोती)   ७० रुपये    ४   २८० रुपये
ज्वारी   सीएसव्ही-१८ (परभणी ज्योती)  ७० रुपये    ४    २८० रुपये
ज्वारी   एसपिव्ही-२४०७ (सुपर मोती)  ७० रुपये   ४   २८० रुपये
जवस  एलएसएल -९३  ८० रुपये   ५   ४०० रुपये
सूर्यफूल   एलएसएफएच-१७१   ३५० रुपये  २   ७०० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT