मराठवाड्यात रब्बीचे उत्पादनही घटणार
मराठवाड्यात रब्बीचे उत्पादनही घटणार 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात रब्बीचे उत्पादन घटणार

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जमिनीत नसलेल्या पुरेशा ओलीमुळे मराठवाड्यातील रब्बीचे पीक संकटात सापडले आहे. पाण्याचा ताण पडल्याने कायिक वाढ प्रभावित झालेल्या मराठवाड्यातील रब्बीच्या उत्पादनातही खरिपाप्रमाणेच घट येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. 

मराठवाड्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १८ लाख ८७ हजार हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात यंदा जवळपास ९ लाख ४ हजार हेक्‍टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ४८ टक्‍के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणीचे क्षेत्र अपेक्षेच्या कसोटीवर निम्म्यापेक्षाही कमी असतानाच पाण्याचा पडलेला ताण खरिपाप्रमाणेच रब्बीचाही घात करून गेला आहे. रब्बी ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. जिरायत ज्वारीला पाण्याचा ताण पडल्यामुळे तिची कायिक वाढ प्रभावित झाली आहे. 

औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत रब्बी ज्वारीची स्थिती असमाधानकारक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रब्बी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भावर आढळून आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. मका पिकाची उगवण चांगली झाली असून, वाढीच्या अवस्थेतील या पिकालाही पाण्याचा ताण बसतो आहे. अल्प प्रमाणात का होईना पाण्याची सोय असलेल्या भागात घेतले गेलेले गव्हाचे पीक ओंब्या लागण्याच्या स्थितीत आहे. हरभऱ्याचे पीक फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. बीड जिल्ह्यात जिरायत हरभरा पिकास पाण्याचा ताण बसल्याने त्याची वाढ प्रभावीत झाली. या जिल्ह्यात हरभऱ्याची स्थिती असमाधानकारक आहे. लातूर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यांत वाढीच्या व काही ठिकाणी घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. तीनही जिल्ह्यात हरभऱ्याची वाढ झाली नसून, पीकस्थिती असमाधानकारक आहे. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सुरवातीला पेरलेल्या हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

कापूस, तुरीच्या उत्पादनातही फटका   मराठवाड्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १७ लाख ७६ हजार हेक्‍टर आहे. यंदा प्रत्यक्षात १५ लाख ८१ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. सर्वसाधारण क्षेत्रापैकी ८९ टक्‍के क्षेत्रावर लागवड झालेल्या कपाशीच्या वेचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. अपवाद वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यांतील कपाशीच्या उत्पादनात ५० ते ६० टक्‍क्‍यांपर्यंत घट येणार हे जवळपास स्पष्ट आहे. दुसरीकडे तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ३९ हजार हेक्‍टर आहे. यंदा यापैकी ४ लाख ५० हजार हेकटरवर तुरीची पेरणी झाली. पक्‍वता, काढणी, मळणी सुरू असलेल्या तुरीच्या उत्पादनात पावसाचा खंड व कोरडवाहू भागातील फूले गळून गेल्याने १० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत घट येण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT