जळगाव ः जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर व जळगाव तालुक्‍यांत हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. संकरित प्रकारचा हरभरा अनेक शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाढविला असून, त्याला सध्या घाटे लागले आहेत. थंडीमुळे पीक जोमात आहे.
जळगाव ः जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर व जळगाव तालुक्‍यांत हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. संकरित प्रकारचा हरभरा अनेक शेतकऱ्यांनी सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाढविला असून, त्याला सध्या घाटे लागले आहेत. थंडीमुळे पीक जोमात आहे.  
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात रब्बी पिके जोमात

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाची स्थिती बरी आहे. मात्र धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मात्र रब्बी पेरणी शंभर टक्के क्षेत्रावर होऊ शकली नसल्याची माहिती आहे. यातच कमी पाणी व कमी खर्चाचे पीक म्हणून शेतकरी हरभऱ्याकडे अधिक वळल्याचे चित्र यंदा आहे.

सध्या विजेसह पाण्याची समस्या आहे. पाऊस यावल, शहादा, चोपडा, शिरपूर आदी सातपुड्यालगतच्या भागातही हवा तसा नव्हता. त्यामुळे या भागातील मक्‍याचे क्षेत्र कमी झाले. कारण मक्‍याला अधिक पाणी आवश्‍यक असते. या भागातील मका पिकाची जागा हरभऱ्याने घेतली असून, संकरित प्रकारचे दोनतीनदा सिंचन केल्यानंतर जोमात येणारे हरभऱ्याचे वाण या भागात पेरण्यात आले आहे.

ऑक्‍टोबरमध्ये जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, मुक्ताईनगर व अमळनेरचा तापीकाठ आदी भागात काळ्या कसदार जमिनीत बऱ्यापैकी ओलावा होता. त्यामुळे दिवाळीनंतरच दादर(ज्वारी)ची पेरणी झाली. दादर निसवली असून, थंडीमुळे अनुकूल स्थिती आहे. दादरसह हरभराही जोमात आहे. तर गव्हाची पेरणी अपेक्षेपेक्षा कमी झालेली असली तरी पीक बऱ्यापैकी आहे.

जळगाव जिल्ह्यात गव्हाची सुमारे २९ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तर दादरची २३ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. मक्‍याची सुमारे ४० हजार हेक्‍टरवर पेरणी झाली असून, हरभऱ्याची सर्वाधिक ९० हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. सूर्यफूल, करडई यांचे क्षेत्र नगण्य आहे. बाजरीची पेरणीही काही भागात सुरू झाली आहे. रब्बीची ९५ टक्के पेरणी जळगाव जिल्ह्यात झाली.

धुळे व नंदुरबारात हरभऱ्याची अनुक्रमे २८ व २७ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. धुळ्यात गव्हाची सुमारे साडेसात हजार हेक्‍टरवर पेरणी झाली असून, नंदुरबारातही सात हजार हेक्‍टरवर पेरणी आहे. नंदुरबारमधील शहादा, धुळयातील शिरपूर, धुळे व शिंदखेडा भागात दादरची बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. धुळ्यात दादरची पेरणी सुमारे १३ हजार हेक्‍टरवर तर नंदुरबारातही चार हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. नंदुरबारात मक्‍याची पेरणी सुमारे १२ हजार हेक्‍टरवर तर धुळ्यात मक्‍याची पेरणी सुमारे ११ हजार हेक्‍टरवर झाली आहे. परंतु धुळ्यासह नंदुरबारात रब्बी पेरणीचा लक्ष्यांक १०० टक्के गाठण्यात यश आलेले नाही. धुळ्यात ७२ टक्के तर नंदुरबारात सुमारे ६० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यंदा आमच्या भागात हरभरा अधिक आहे. पाऊस कमी असल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे कमी पाण्याचे पीक म्हणून हरभऱ्याची पेरणी झाली आहे. - पुरुषोत्तम पटेल, शेतकरी, शहादा (जि. नंदुरबार)

दादरसह हरभऱ्याचे पीक आमच्या भागात जोमात आहे. सध्या थंडी असल्याने पिकांना अनुकूल वातावरण आहे. बाजरीची पेरणी सुरू झालेली नाही. - संदीप नारखेडे, शेतकरी, आसोदे (ता. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT