Rabbi planning on 1.5 million hectares in Latur division
Rabbi planning on 1.5 million hectares in Latur division 
मुख्य बातम्या

लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन

टीम अॅग्रोवन

लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत १५ लाख ६६ हजार २५४ हेक्टरवर रब्बीतील पेरणीचे नियोजन आहे, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील सूंत्रांनी दिली. 

लातूर कृषी विभागांतर्गत पाचही जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ८६ हजार ६०७ हेक्‍टर आहे. २०१७ ते २०१९ या दरम्यान झालेल्या रब्बी पेरणीसाठीच्या बियाणे विक्रीचा आढावा घेतला. त्यानुसार सरासरी १ लाख ७९ हजार ७३० क्विंटल रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, मका, करडई, सूर्यफूल, जवस व इतर बियाण्यांची विक्री झाली होती. त्यानुसार यंदाच्या रब्बी हंगामासाठी १५ लाख ६६ हजार २९४ हेक्टरवर रब्बीची पेरणी नियोजित आहे. 

यंदाच्या रब्बीत ज्वारी ४ लाख ५ हजार ४४३ हेक्टरवर, गहू १ लाख ७० हजार ६३३ हेक्टर, हरभरा ९ लाख २३ हजार ५२ हेक्टर, मका २० हजार ९०२ हेक्टर, करडई २३ हजार ४२५ हेक्टर, सूर्यफूल ४१९६ हेक्टर, जवस २३८७ हेक्‍टर, तर इतर रब्बी पिके १२ हजार २५६ हेक्टरवर नियोजित आहेत.

बियाणे बदल दराचा विचार करता रब्बी ज्वारीचे बियाणे २१ टक्के, गहू ४० टक्के, हरभरा ३५ टक्के, मका १०० टक्के, करडई ३५ टक्के, सूर्यफूल १०० टक्के बदल होणे कृषी विभागाला अपेक्षित आहे. 

दरम्यान, सार्वजनिक व खासगी व्यवस्थेद्वारे अनुक्रमे १ लाख ३० हजार ९८३ क्विंटल व १ लाख ७३ हजार ५३२ क्विंटल असे ३ लाख ४ हजार ५१६ क्विंटल बियाणे यंदाच्या रब्बी हंगामासाठी विभागाला आवश्यक असणार आहे.

महाबीजमार्फत १ लाख २० हजार २३३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT