नगरमधील सव्वा दोन हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा A quarter of two thousand farmers in the town are waiting for the subsidy 
मुख्य बातम्या

नगरमधील सव्वा दोन हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

मागेल त्याला शेततळे योजनेतून शेततळ्याची कामे पूर्ण करणाऱ्या २ हजार २४८ शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. दोन वर्षांपूर्वी हे शेततळी केली आहेत. कृषी विभागाने अनुदानासाठी ११ कोटी १३ लाखांची मागणी केली असल्याची माहितीदेण्यात आली.

टीम अॅग्रोवन

नगर : मागेल त्याला शेततळे योजनेतून शेततळ्याची कामे पूर्ण करणाऱ्या २ हजार २४८ शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. दोन वर्षांपूर्वी हे शेततळी केली आहेत. कृषी विभागाने अनुदानासाठी ११ कोटी १३ लाखांची मागणी केली असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.   राज्यात कोरोनाचे संकट आल्याने गेल्या वर्षापासून मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे बंद आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात १६ हजार ९९३ शेततळ्याची कामे या योजनेतून  पूर्ण झाली आहेत. त्यातील आतापर्यंत १४ हजार ७३३ शेतकऱ्यांना ७२ कोटी ४३ लाख रुपयाचे अनुदान वितरित केले आहे. साधारण २०१९-२०या वर्षात पूर्ण केलेल्या तसेच त्याआधीही काही कामे पूर्ण केलेल्या शेततळ्याचे अनुदान मिळण्याची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून, नगर जिल्ह्यामध्ये असे २ हजार २४८ शेतकरी आहेत. त्यासाठी साधारण ११ कोटी १३ लाखाची गरज असून, तेवढी मागणी केली असल्याचे कृषी विभागातून सांगितले जात आहे.   तालुकानिहाय शेततळी कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगर तालुक्यात ५४, पारनेर तालुक्यात ८०, पाथर्डी तालुक्यात १४५, जामखेड तालुक्यात ३१, श्रीगोंदा तालुक्यात ९२४, कर्जत तालुक्यात ४०५. नेवासा तालुक्यात १३०, श्रीरामपूर २०, शेवगाव ८०, राहुरी ५५, संगमनेर तालुक्यात ९२, राहाता तालुक्यात ९९, कोपरगाव तालुक्यात ४९, अकोले तालुक्यात ८४ शेतकऱ्यांना अनुदान देणे बाकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी ६२०० हेक्टर घेणार

Farmers Meeting: केंद्रीय कृषिमंत्री आज साधणार शेतकरी संघटनांशी संवाद

Animal and Fisheries Skill Development: कौशल्यांद्वारे पशुपालन, मत्स्योद्योगाला मिळणार गती

Agriculture Department Incorrect Structure: आस्थापना प्रमुखावर कारवाई करा

India Reservoir Storage: देशातील जलाशयांत पाणीसाठा पोहोचला ७०.३ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT