शेतीला सोलर कुंपण घाला  Put a solar fence on the farm 
मुख्य बातम्या

शेतीला सोलर कुंपण घाला 

वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले आहे, त्या भागात सोलर फेन्सिग लावण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले आहे, त्या भागात सोलर फेन्सिग लावण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.  मानव वन्यजीव संघर्षाबाबत समन्वय साधण्यासाठी आंतर विभागीय जिल्हास्तरीय समिती स्थापन करणेबाबत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे सभा घेण्यात आली.  या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वन विभागाचे अधिकारी केशव वाबळे, किरण जगताप, निरंजन दिवाकर, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता नितीन बनसोड, विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंता मनीषा बुरांडे उपस्थित होते.  जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘वाघाचा वावर असलेल्या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून वाघाच्या वावर कोणत्या भागात कोणत्या वेळी जास्त असतो याची माहिती प्राप्त होईल व त्या भागात वाघाचे नागरिकांवरील हल्ल्याला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करता येईल. वन्यप्राण्यांना अटकाव करण्यासाठी अनेक ठिकाणी तारेत विद्युत प्रवाह (करंट) सोडण्यात येतो. त्यामुळे अनेकदा वन्यजीव, पाळीव प्राणी व जनसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. अशा प्रकारे तारेत विद्युत प्रवाह सोडून नागरिक व वन्यजीव यांना धोका निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याविरुद्ध वीजचोरी व जीवितहानीचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हे नोंदवावेत.’’  विविध वनवृत्तामध्ये वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्याजवळ बोअरवेल व सोलरचे काम केल्यास टँकरद्वारे पाणी सोडण्याची गरज राहणार नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वन्यजीवाद्वारे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येते. मात्र नुकसान होऊ नये, यासाठी वाघाचा वावर असलेल्या गावांमध्ये प्रामुख्याने प्राथमिक बचाव पथक व रॅपिड रिस्पॉन्स टीम गठित करून ॲक्टिव्ह करावी. रॅपिड रिस्पॉन्स टीम व प्राथमिक बचाव पथकाद्वारे माहिती देऊन जनजागृती करावी. वाघाची हालचाल आणि कालावधी समजून घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरा लावावेत. त्यासाठी स्थळांचा शोध घ्यावा आणि मोबाइलचलित कॅमेराचा वापर करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT